Mahim Fort : माहिमच्या किल्ल्यावरही लख लख चंदेरी दुनिया

माहिम किल्ल्या अतिक्रमणमुक्त करण्यात आल्यानंतर आता किल्ल्याला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या किल्याचे आता सुशोभीकरण केले जात असून या अंतर्गत या किल्ल्यावर शिवडी आणि वरळी किल्ल्याप्रमाणोच विद्युत रोषणाई केली जात आहे.

3094
Mahim Fort : माहिमच्या किल्ल्यावरही लख लख चंदेरी दुनिया
Mahim Fort : माहिमच्या किल्ल्यावरही लख लख चंदेरी दुनिया

माहिम किल्ल्या (Mahim Fort) अतिक्रमणमुक्त करण्यात आल्यानंतर आता किल्ल्याला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या किल्ल्याचे आता सुशोभीकरण केले जात असून या अंतर्गत या किल्ल्यावर शिवडी आणि वरळी किल्ल्यांप्रमाणोच विद्युत रोषणाई केली जात आहे. या किल्ल्यावरील विद्युत रोषणाईचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा किल्ला विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. (Mahim Fort)

मुंबईतील तब्बल ८०० वर्षे जुन्या किल्ल्यावर मोठ्याप्रमाणता अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटवून या किल्ल्याच्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या आहे. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून या किल्ल्यावरील तब्बल २६७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या किल्ल्याचे जतन करण्यात येत आहे. हे अतिक्रमण हटल्यामुळे या किल्ल्यावर सामान्य जनतेला जाण्याचा मार्गही खुला झाला असून सर्व प्रकारच्या डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला जाणार आहे. (Mahim Fort)

(हेही वाचा – Prakash Ambedkar :  प्रकाश आंबेडकरांची लोकसभेच्या १२ जागांची मागणी; आघाडीत बिघाडीची शक्यता… )

विद्युत रोषणाईसाठी ९५ लाख रुपयांचा खर्च

हा किल्ला अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यानंतर शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी पुढाकार घेत या किल्ल्याचे सौदर्य वाढवून पर्यटकांनाही हा किल्ला आकर्षिक व्हावा या दृष्टीकोनातून याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या मंजूर निधीतून माहिम किल्ल्याच्या विद्युत रोषणाईचे काम हाती घेण्यात आले आहे. (Mahim Fort)

माहिम किल्ल्याच्या (Mahim Fort) दर्शनीय भागावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करून आकर्षक सुशोभिकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे ९५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या विद्युत रोषणाईचे काम लेक्सा लाईटींग टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लाईटींगचे काम जवळपास पूर्ण झाले असून प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या विद्युत रोषणाईच्या कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. (Mahim Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.