Bhaucha Dhakka : मुंबईतील भाऊचा धक्का येथे ६ जण बेशुद्ध पडले; त्यातील दोघांचा मृत्यू

414

मुंबईतील भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) या ठिकाणी एक दुर्घटना घडली, ज्यामध्ये सहा जण बेशुद्ध पडले, त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. बेशुद्धावस्थेत असलेल्या चार जणांवर जे जे रुग्णालयांत दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

जे जे रुग्णालयात दाखल

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. येलोगट पोलीस ठाणे हद्दीत न्यू फिश जेटी येथे मच्छिमार नौका अंजनी पुत्र पहाटे २ वाजता भाऊच्या धक्क्यावर आणण्यात आली. तेव्हा बोटीतील मासे काढण्यासाठी एक कामगार बोटीत उतरला तेव्हा तो बेशुद्ध पडला. यानंतर दुसरा कामगार बोटीत उतरला तेव्हा तोही बेशुद्ध पडला. असे करत एकूण सहा कामगार बेशुद्ध पडले. त्या सर्वांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर बीश्रीनिवास आनंद यादव (३५) आणि नागा डॉन संजय (बोट मालक) यांना मयत घोषित केले. तर सुरेश मेकला (२८) व्हेंटिलेटरवर असून इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. मच्छिमार बोटीत विषारी गॅस तयार झाल्याने हे कामगार बेशुद्ध पडल्याचे समजते.

(हेही वाचा Rajanath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवरील हल्लेखोरांना पाताळातून शोधून काढू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.