Violation Of IT Park : दादरमधील ‘त्या’ चारही इमारतींवरील कारवाई थंडावली

दादर पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्गाला जोडणाऱ्या गॅरेज गल्ली परिसरातील भवानी प्लाझा, ओम ऍनेक्स, अटलांटिका प्लाझा आणि पलई कमर्शियल या चार इमारतींमध्ये आयटी पार्कच्या नावावर एफएसआयचा लाभ घेत बांधकाम केले असले तरी प्रत्यक्षात या बांधकामाचा गैरवापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

1433
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे

दादर पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्गाला जोडणाऱ्या गॅरेज गल्ली परिसरातील भवानी प्लाझा (Bhavani Plaza), ओम ऍनेक्स (Om Annex), अटलांटिका प्लाझा (Atlantica Plaza) आणि पलई कमर्शियल (Palai Commercial) या चार इमारतींमध्ये आयटी पार्कच्या (IT Park) नावावर एफएसआयचा लाभ घेत बांधकाम केले असले तरी प्रत्यक्षात या बांधकामाचा गैरवापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. मात्र, यासर्व बांधकामांवर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसून याप्रकरणी पाठवलेल्या दुसऱ्या नोटीसचा कालावधीही संपुष्टात आला आहे. त्यामुळे या बांधकामाचा गैरवापर करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन (Municipal Administration) कधी कारवाई करणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील आठवड्यात कारवाई केली जाईल, असे जी उत्तर विभागाचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात ही कारवाई न करता याला संरक्षण दिले जात आहे असाही सवाल केला जात आहे. (Violation Of IT Park)

दादर पश्चिम येथील भवानीशंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग तसेच गॅरेज गल्ली आदी परिसरामंमध्ये अनेक इमारतींमध्ये आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली एफएसआचा (FSI) लाभ घेत बांधकाम करण्यात आले. या आयटी पार्कचा (IT Park) गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आले आहे. तब्बल ११ एकर भुखंडावर आहे आयटी पार्कच्या (IT Park) नावावर इमारती उभ्या असून या आयटी पार्कचे (IT Park) रूपांतर गार्मेंटन्स मध्ये झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भवानी प्लाझा (Bhavani Plaza), ओम ऍनेक्स (Om Annex), अटलांटिका प्लाझा (Atlantica Plaza) आणि पलई कमर्शियल (Palai Commercial) या चार इमारतींमधील सुमारे ४५० व्यापाऱ्यांना महापालिका जी उत्तर विभागाच्यावतीने जागेचा गैरवापर आणि अनधिकृत बांधकाम याप्रकरणी नोटीस जारी करण्यात आल्या आहे. (Violation Of IT Park)

आयटी पार्कचा (IT Park) गैरवापर करतानाच प्रत्यक्षात चेंज ऑफ युजर्स करून न घेता गारमेंट्स चालवणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांच्या नाड्या चांगल्याच आवळल्या गेल्या असल्या तरी पहिल्या नोटीसनंतर दुसऱ्या नोटीसचा कालावधीही संपुष्टात आल्यानंतर संबंधित वापरासंदर्भाततील कागदपत्रे गाळेधारकांनी सादर केली नाहीत त्यांच्या विरोधात ठोस कारवाईची गरज आहे. परंतु कागदपत्रे सादर न करणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करणे आवश्यक असतानाही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. (Violation Of IT Park)

(हेही वाचा – Bhaucha Dhakka : मुंबईतील भाऊचा धक्का येथे ६ जण बेशुद्ध पडले; त्यातील दोघांचा मृत्यू)

तसेच ज्यांच्याकडून कागदपत्रे सादर केल्यावर ती योग्य असली तरी स्थळ निरिक्षणानंतर तेथील अतिक्रमणांवर कारवाई होणे अपेक्षित आहे, तीसुध्दा केली जात नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ नोटीस बजावून त्यांना घाबरवून टाकण्याचे काम केले आहे का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या बांधकामाच्या गैरवापरामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने यासर्वांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून मालमत्ता कराची वसुली करण्याची प्रक्रियाही अत्यंत संथ गतीने सुर आहे. त्यामुळे केवळ दादरच (Dadar) नव्हे तर मुंबईत मालमत्ता कर वाचवण्यासाठी आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधकाम केले जात आहे, तसेच एफएसआयचा (FSI) लाभ घेत अधिकचे बांधकाम केले जात असले तरी प्रत्यक्षात बांधकामानंतर वापराचे गैरवापर केला जातो आणि नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून दादरमधील (Dadar) सुमारे ४५० गाळेधारकांवर काय कारवाई केली आहे, याचा हिशोब आता दादरमधील (Dadar) जनतेला हवा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन (Municipal Administration) यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Violation Of IT Park)

आयटी पार्कचा गैरवापर केलेल्या दादरमधील इमारती
भवानी प्लाझा इमारत – १३० मध्ये नोटीस
ओम अॅनेक्स इमारत – ४० नोटीस
अटलांटिका प्लाझा इमारत – १४० नोटीस
पलई कमर्शियल इमारत – १४० नोटीस (Violation Of IT Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.