Israel Embassy: दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी पोलिसांना सापडले पत्र

दिल्ली पोलीस आणि सुरक्षा पथक अजूनही या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

234
Israel Embassy: दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी पोलिसांना सापडले पत्र
Israel Embassy: दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी पोलिसांना सापडले पत्र

नवी दिल्लीत असलेल्या इस्रायल दूतावासाजवळ (Israel Embassy) स्फोट झाल्याचा दूरध्वनी मंगळवारी सायंकाळी दिल्ली पोलिसांना आला. या बातमीमुळे खळबळ उडाली. याबाबत अद्याप कोणतीही स्फोटके सापडली नसून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते गाय नीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सायंकाळी ५.४८ च्या सुमारास दूतावासाच्या जवळ स्फोट झाल्याची माहिती दिली. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा पथक अजूनही या प्रकरणाचा शोध घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना घटनास्थळी मिळालेले पत्र इस्रायलच्या ध्वजात गुंडाळलेले होते. हे पत्र एका पानाचे असून त्यामध्ये ‘इस्रायलचा गाझावरील हल्ला’ आणि ‘बदला’ असे लिहिले होते. या पत्रात इस्त्रायल गाझावरील कारवाईवर टीका करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Dried Fruit: थंडीची चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याची मागणी वाढली )

दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनीदेखील त्यांना ५ वाजून ४८ मिनिटांनी स्फोट झाल्याचा दूरध्वनी आला आणि तो दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षावरून हस्तांतरित करण्यात आला, असे सांगितले. अग्निशमन विभागाने तातडीने २ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूरध्वनी करणाऱ्याने पोलिसांना दूतावासाच्या मागे स्फोट झाल्याचे सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान हिंदी भवनात तैनात असलेल्या एका रक्षकाने दूतावासाच्या मागे मोठा आवाज ऐकून आपण त्याची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिसराच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दूतावासातील सर्व अधिकारी आणि कामगार सुरक्षित

दूतावासाच्या मागे स्फोट झालेल्या ठिकाणी असलेल्या बागेमध्ये इस्रायली राजदूताला उद्देशून टाइप केलेले पत्र सापडले आहे. या पत्राची सत्यता पडताळून बघण्यात येत आहे, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. डेप्युटी चीफ ऑफ मिशन (इस्रायल) ओहद नकाश कायनार यांनी आमचे दूतावासातील सर्व अधिकारी आणि कामगार सुरक्षित आहेत. आमची सुरक्षा पथके दिल्लीच्या स्थानिक सुरक्षा पथकाच्या सहकार्याने काम करत आहे आणि ते या प्रकरणाची अधिक चौकशील करतील, अशी माहिती दिली आहे.

इस्रायली ध्वजात गुंडाळलेले पत्र सापडले, सीसीटीव्हीमध्ये २ संशयित
दिल्लीतील चाणक्यपुरी येथील इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटासंदर्भात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. यामध्ये २ दोन संशयित दिसतआहेत. या दोन्ही संशयितांचा माग काढण्यात व्यस्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.