E-Soil: पिकांच्या वाढीसाठी शास्त्रज्ञांनी लावला ‘इलेक्ट्रॉनिक माती’चा शोध

246
E-Soil: पिकांच्या वाढीसाठी शास्त्रज्ञांनी लावला 'इलेक्ट्रॉनिक माती'चा शोध
E-Soil: पिकांच्या वाढीसाठी शास्त्रज्ञांनी लावला 'इलेक्ट्रॉनिक माती'चा शोध

तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे, हे शास्त्रज्ञांनी लावलेल्या विविध शोधांद्वारे सिद्ध होत आहे. शास्त्रज्ञांनी नुकताच ‘इलेक्ट्रॉनिक माती’चा शोध लावला. या अनोख्या संशोधनाचा शेतीसाठी आणि पिकं जोमाने वाढण्यासाठी फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

लिकोपिंग विद्यापीठाचे शास्रज्ञ एलेनी स्टॅव्हिनिडो यांनी आणि त्यांच्या पथकाने ‘इलेक्ट्रॉनिक माती’ चा (ई-सॉईल) (E-Soil) अनोखा शोध लावला आहे. संगणक, टीव्ही, फ्रीज अशी जगात एकही वस्तू नाही ज्यामध्ये तांत्रिक अर्थात इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करण्यात आलेला नाही. या संशोधकांनी विद्युत माती विकसित केली आहे. जी १५ दिवसांत जवस (बार्ली) रोपांची सरासरी ५० टक्के अतिरिक्त वाढ करू शकते.

(हेही वाचा – Houthi Attack: अमेरिकेने १२ हौथी ड्रोन आणि ५ क्षेपणास्त्रे पाडली, इस्रायल-हमास युद्धादरम्यान लाल समुद्रात जहाजांवरील हल्ल्यांमुळे तणाव )

हायड्रोपोनिक लागवडीसाठी विद्युत प्रवाहकीय लागवड सब्सट्रेट विकसित केला, ज्याला ते ई-सॉईल म्हणतात. त्यात वीज प्रवाहित करून जवस अंकुरित केले जातात.

‘इलेक्ट्रॉनिक’मातीचे फायदे…
– या प्रयोगाअंतर्गत रोपांना देण्यात येणारे पाणी असे प्रवाहित केले जाते, जेणेकरून प्रत्येक रोपाला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील. त्यामुळे फार कमी पाण्याची गरज भासते, जी पारंपरिक शेतीमध्ये शक्य नाही.
-हायड्रोपोनिक्स जागेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठ्या टॉवरमध्ये उभी लागवड करणे शक्य होते. या पद्धतीने आधीच लागवड केलेल्या पिकांमध्ये लेट्युस, औषधी वनस्पती आणि काही भाज्या यांचा समावेश होतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.