राम मंदिराचे उद्घाटन जसे जसे जवळ येत तसे देशभरात उत्साह वाढत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने राम मंदिरासाठी दान देत आहे. यामध्ये आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेत आपला काही तरी खारीचा वाटा असावा असे देशातील प्रत्येक राम भक्ताला वाटत आहे. अशीच एक अनोखी भेटवस्तू लखनौ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना पेटंट वर्ल्ड क्लॉक (world Clock) सुपूर्द केले आहे. (Ayodhya Ram Mandir)
अयोध्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. तर २५ जानेवारी पासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. राम मंदिर उदघाटनाबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या घड्याळाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी अनेक देशांची वेळ सांगते. हे घड्याळ राम मंदिर, अयोध्या जंक्शन आणि हनुमान गढी मंदिराला समर्पित करण्यात आले आहे. अनिल कुमार साहू लखनऊमध्ये भाजी विक्रते म्हणून काम करतात.सध्या उत्तर प्रदेश सरकार या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. (Ayodhya Ram Mandir )
Ayodhya, Uttar Pradesh: A vegetable seller from Lucknow Anil Kumar Sahu dedicated one patented world clock to Ram Temple, Ayodhya Junction and Hanumangarhi temple each, which show the time of nine countries simultaneously.
World Clock was handed over to the General Secretary of… pic.twitter.com/bjUZEDYIkJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 25, 2023
(हेही वाचा : E-Soil: पिकांच्या वाढीसाठी शास्त्रज्ञांनी लावला ‘इलेक्ट्रॉनिक माती’चा शोध)
या देशांच्या वेळा दिसणार
भारत, मेक्सिको,जपान, दुबई,टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन या देशांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community