Accident : पंढरपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

153
Accident : पंढरपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Accident : पंढरपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

कर्नाटकातील गुलबर्गा येथील काही जण गाडीने शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जात असताना  चौघा भविकांचा अपघात झाला. पंढरपूर करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Accident)

करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ बुधवारी ( २७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाता नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की अपघातानंतर ही गाडी पलटी झाली.
श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार,जेमी कुनशामत, शारदा हिरेमेठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच गावातील लोकांना ही घटनास्थळी जाऊन त्यांनी त्या चौघांना  रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. (Accident)

(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : भाजी विक्रेत्याने राम मंदिराला भेट दिले ‘वर्ल्ड क्लॉक’, एकत्रित दाखविणार अनेक देशांची वेळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.