Uttam Pacharane : ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन

पाचारणे यांनी कष्टाने, पुण्याचे अभिनव कला विद्यालय आणि मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कला शिक्षण पूर्ण केले. पाचारणे यांना केंद्र सरकारचा ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही तरुण वयातच मिळाला.

161
Uttam Pacharane : ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन
Uttam Pacharane : ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे निधन

ज्येष्ठ शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम रोहिदास पाचारणे उर्फ आण्णा (Uttam Pacharane) (वय ६७ वर्षे) यांचे मंगळवार, २७ डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. पाच दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. मेंदूतील रक्तस्रावामुळे ते कोमात गेले होते. गोरेगावमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पहाटे ५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. गोरेगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम म्हणजे दुसरा स्वातंत्र्योत्सव, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे प्रतिपादन)

या वेळी माजी मंत्री राम नाईक, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुळकर, रवी मंडलिक, मारुती शेळके, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे (Bombay Art Society) अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव चंद्रजित यादव, जहांगीर आर्ट गॅलरीचे (Jehangir Art Gallery) कार्यकारिणी सदस्य, तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे (J.J. School of Arts) प्राध्यापक, तसेच कला क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते

अहमदनगर जिल्ह्यातील चखालेवाडी या छोट्याशा गावी जन्मलेले आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत बालपण गेलेले पाचारणे यांनी कष्टाने, पुण्याचे अभिनव कला विद्यालय आणि मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कला शिक्षण पूर्ण केले. पाचारणे यांना केंद्र सरकारचा ललित कला अकादमीचा (Lalit Kala Akademi) राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही तरुण वयातच मिळाला.

चित्र-शिल्पकारांना सोयी-सुविधा देण्यात सरकार कायमच आखडता हात घेणार आहे का ? – सुहास बहुळकर, ख्यातनाम चित्रकार

ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात व्हावे, हे आमचे मित्र उत्तम पाचारणे यांचे स्वप्न होते. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी धडपड करणारे ते स्वप्न प्रत्यक्षात न येताच ते हे जग कायमचे सोडून गेले. सर्जनशील शिल्पकार, निरलस कार्यकर्ता आणि संघटक ही त्यांची ओळख. दृश्यकलेच्या संदर्भात कमालीचे दुर्लक्ष करण्यात आणि चित्र-शिल्पकारांना सोयी-सुविधा आणि प्रोत्साहन देण्यात सरकार कायमच आखडता हात घेणार आहे का, असा प्रश्न त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा विचारावा वाटतो.

(हेही वाचा – Accident : पंढरपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू)

पाचारणे हे जग सोडून गेले. आज आमचा मित्र हे जग सोडून गेला, उद्या आम्हीही हे जग सोडून गेलो, तरी दृश्यकलेच्या बाबतीत या आधीचे आणि विद्यमान सरकार असेच वागणार आहे का, त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची सद्बुद्धी शासनाला मिळावी, ही प्रार्थना ! (Uttam Pacharane)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.