संपूर्ण देशभरात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होते. विशेषतः मुंबई मध्ये भरपूर लोक येथील सेलीब्रेशन करण्यासाठी येतात. त्यातच यावेळी २५ ते ३१ डिसेंबर या दरम्यान लागून सुट्ट्या आल्याने मुंबईत गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी,गोराई,दादर चौपाटी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची तुफान गर्दी होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उपनगरातून मुंबई शहरात लाखो नागरिक, तरुण-तरुणी मुंबईच्या चौपट्यांवर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.(central Railway)
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला चार विशेष लोकल चालविणार आहे. त्यामुळे मुंबईत रात्री उशिरा सेलीब्रेशनला येणाऱ्या नागरिकांना घरी परत जाण्यासाठी मदत होणार आहे. खरतर नवीन वर्षाच्या दिवशी मध्य रेल्वे चालविणार आहे. त्यामुळे नववर्षाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना ही एक भेटच आहे. (Central Railway )
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री) प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.
मुख्य लाईन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ /१.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कल्याण येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
पनवेल येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२२/१.१.२०२३ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल. या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community