दिल्लीतील चाणक्यपुरी येथे असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ २६ डिसेंबरच्या सायंकाळी स्फोट झाला. (Israel Embassy Attack) या स्फोटाच्या संदर्भात पोलिसांना सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळाले असून त्यात २ संशयित दिसत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
(हेही वाचा – Central Railway : नव वर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे चा मोठा निर्णय; जाणून घ्या कधी आहे शेवटची ट्रेन)
इस्रायलच्या गाझावरील कारवाईचा सूड
दुसरीकडे इस्रायलच्या (Israel) राष्ट्रीय संरक्षण परिषदेने (National Defense Council) भारतात रहाणार्या इस्रायली नागरिकांसाठी प्रवासासाठीच्या सूचना प्रसारित केल्या आहेत. याअंतर्गत त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांना घटनास्थळावरून इस्रायली ध्वजात गुंडाळलेले पत्र सापडले. यात ‘इस्रायलचे गाझावरील आक्रमण’ (Israel’s invasion of Gaza) आणि ‘सूड’ असे लिहिले होते. या पत्रात इस्रायलच्या गाझावरील कारवाईवर टीका करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या भागात कोणतीही स्फोटके सापडली नसल्याचे सांगितले आहे. त्यांना २६ डिसेंबरला स्फोट झाल्यानंतर दूरभाषवरून याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी उपस्थित झाले.
(हेही वाचा – BJP : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीमध्ये)
कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित
इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते गाय नीर यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास दूतावासाजवळ स्फोट झाला. आमचे कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
वर्ष २०२१ मध्ये याच दूतावासाबाहेर कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. यामध्ये तीन गाड्यांची हानी झाली होती. त्या वेळी इस्रायलने इराणवर कटाचा आरोप केला होता. (Israel Embassy Attack)
हेही पहा –