काश्मिरात दहशतवादी कारवायांना समर्थन देणे, दशतवाद्यांना पाठिंबा देणे, देशविरोधी कारवाया करणे या सर्व कारणांमुळे काश्मिरातील मुस्लिम लीग (मसरत आलम गट) (Muslim League) या संघटनेवर बुधवार, २७ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्या संबंधीचे ट्विट केंद्रीय अमित शाह यांनी केले आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री शाह?
बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम लीग (Muslim League) जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ही UAPA अंतर्गत बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य, जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. दहशतवादी कारवायांचेही समर्थन करतात. तसेच, लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता याच्या विरोधात कृती करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. त्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्विट केले.
(हेही वाचा BJP : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीमध्ये)
मुस्लिम लीगची मालमत्ता जप्त होणार
Muslim League ही संघटना पाकिस्तान आणि त्याच्या प्रॉक्सी संघटनांसह विविध स्त्रोतांकडून निधी गोळा करते. UAPA अंतर्गत कारवाई म्हणजे काय? बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत केंद्र सरकार कोणत्याही संघटनेला ‘बेकायदेशीर’ किंवा ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करू शकते. जर एखादी संस्था ‘बेकायदेशीर’ किंवा ‘दहशतवादी’ किंवा ‘प्रतिबंधित’ म्हणून घोषित केली गेली, तर तिचे सदस्य गुन्हेगार ठरू शकतात आणि मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community