अमळनेर (Amalner) येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घेतलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना बुधवारी (२७ डिसेंबर) निमंत्रण देण्यात आले. पूज्य साने गुरुजी (Sane Guruji) यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वस्त केले. (Marathi Sahitya Sammelan)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे आणि संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी बुधवारी (२७ डिसेंबर) वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांना या आगामी संमेलनाचे निमंत्रण दिले. (Marathi Sahitya Sammelan)
(हेही वाचा – Dadar Dharavi Nala : दादर धारावी नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला एक कोटी रुपयांनी, कारण आहे हे!)
साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही केवळ खान्देशसाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईल, असा विश्वासही शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केला. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा लाभली आहे. यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल, असेही शिंदे म्हणाले. (Marathi Sahitya Sammelan)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी साहित्य संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. संमेलनासाठी शासनातर्फे सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे सांगत त्यांनी संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. (Marathi Sahitya Sammelan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community