Sharad Pawar : सहसा मी मंदिरात जात नाही…; शरद पवारांना मिळाले आहे का रामलल्ला प्रतिष्ठापनेचे निमंत्रण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे Sharad Pawar यांना निमंत्रण मिळाले का, याविषयी विचारण्यात आले. त्या वेळी शरद पवार म्हणाले की, ''राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही. सहसा मी मंदिरात जात नाही.''

348
Sharad Pawar : सहसा मी मंदिरात जात नाही...; शरद पवारांना मिळाले आहे का रामलल्ला प्रतिष्ठापनेचे निमंत्रण ?
Sharad Pawar : सहसा मी मंदिरात जात नाही...; शरद पवारांना मिळाले आहे का रामलल्ला प्रतिष्ठापनेचे निमंत्रण ?

सध्या अयोध्या (Ayodhya) राममय झाली आहे. राममंदिरातील रामलल्ला प्रतिष्ठापना (Rammandir Pran Pratishtha) सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

सोहळा धार्मिक असला, तरी यावर राजकारण चालू आहे. कोणत्या राजकीय नेत्याला निमंत्रण मिळाले आणि कोणत्या राजकीय नेत्याला निमंत्रण मिळाले नाही, याविषयी चर्चा चालू आहे. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’चा एकला चलो रे, मतविभागणीचा फायदा महायुतीला)

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रण मिळाले का, याविषयी विचारण्यात आले. त्या वेळी शरद पवार म्हणाले की, ”राममंदिर (Rammandir) उद्घाटनाचे निमंत्रण नाही. सहसा मी मंदिरात जात नाही.”

‘ती’ जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली

या वेळी शरद पवार यांनी भाजपवरही टीका केली आहे. राममंदिर उभारल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली, तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली.’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) घेतली. राममंदिराचे भाजप (BJP) राजकारण करते की, व्यवसाय माहित नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) पुढे म्हणाले.

(हेही वाचा – Fire : मालाडमधील शॉपिंग मॉलला भीषण आग; जीवितहानी नाही )

‘इंडी’ आघाडीचे नेते संभ्रमात

22 जानेवारीला श्रीराम मंदिरात (ShriRam Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जगभरातील महनीय व्यक्ती येणार आहेत. परंतु ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र अजूनही संभ्रम आहे. ‘कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल’, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.