Ayodhya Ram Mandir : भाजपकडून राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव; मुंबईतील प्रत्येक वार्डात दीपोत्सव

राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डांत १० हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे.

251
Ayodhya Ram Mandir : भाजपकडून राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव; मुंबईतील प्रत्येक वार्डात दीपोत्सव
Ayodhya Ram Mandir : भाजपकडून राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव; मुंबईतील प्रत्येक वार्डात दीपोत्सव

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उद्घाटन होत असून भाजपकडून या सोहळ्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाच्या दिवशी मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डांत १० हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. (Ayodhya Ram Mandir)

मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या यासंदर्भात माहिती दिली. भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची (Ayodhya Ram Mandir) लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे, अशी माहिती शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. येत्या २२ जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) जाऊन रामाचे दर्शन घेता यावे म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक विशेष ट्रेन सोडली जाईल. या माध्यमातून सामान्य नागरिकांना भगवान रामाचे दर्शन घडविण्यात येईल, अशी माहिती आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’चा एकला चलो रे, मतविभागणीचा फायदा महायुतीला)

राम मंदिराची लढाई भारतीय जनता पक्ष लढवत होता

२२ जानेवारी हा राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाचा दिवस प्रत्येक हिंदूचे स्वप्न पूर्ण होण्याचा आहे. हजारो वर्षांच्या युद्ध विराम देण्याचा आणि साधूसंतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस आहे. विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या मेहनतीचे फळ दिसणारा दिवस आहे. संघ परिवाराने समाजाला जोडण्याचे परिश्रम केले, त्याची सांगता आता होते आहे. ज्यावेळी सगळे लोक विरोध करत होते, यात्रा अडवत होते. कारसेवकांवर गोळ्या घालत होते, अडवाणींना अटक करत होते. मोदी, प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई करत होते. कल्याण सिंग यांचे सरकार घालवत होते त्यावेळी राम मंदिराची (Ayodhya Ram Mandir) लढाई भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) लढवत होता, असे शेलार (Ashish Shelar) म्हणाले. (Ayodhya Ram Mandir)

दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक २२ आणि २३ डिसेंबरला दिल्लीत पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah), राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पक्षाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक राज्यांना पक्षाने सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जिंकण्यासाठी त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यासंबंधी बैठका घेतल्या जात आहेत, असे शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. तसेच मुंबईतील लोकसभेच्या (Lok Sabha) सहाही जागा महायुती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.