उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेवर येताच त्यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घरावर थेट बुलडोझर चालवण्याचा सपाटा लावला. या धडक कारवाईमुळे या राज्यात महिलांवर अत्याचार करण्याची कुणी हिमंत करत नाही. त्यानंतर नुकतेच राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले भजन लाल शर्मा यांनीही अशा गुन्ह्याच्या (Crime) आरोपीच्या घरावरही बुलडोझर फिरवला, त्यामुळे मुख्यमंत्री भजन लाल शर्माही चर्चेत आले, आता मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्या पावलावर पाऊल टाकत बलात्काराच्या आरोप असणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे.
चार आरोपींची घरे जमीनदोस्त
मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर मध्य प्रदेशातील पोलीस आणि प्रशासन चांगलेच सक्रिय झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील नर्मदापुरमचे येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना धडा शिकवण्यास सुरुवात केली. नर्मदापुरमच्या बीटीआय परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारातील गुन्ह्यातील (Crime) चारपैकी दोन आरोपींच्या ‘बेकायदेशीर घरावर’ बुधवारी प्रशासनाने बुलडोझर फिरवला. पीडित तरुणीने मंगळवारी सायंकाळी उशीरा पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चार आरोपींची घरे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. आरोपीचे घर फोडताना नगर दंडाधिकारी संपदा सराफ, तहसीलदार देवशंकर धुर्वे, एसडीओपी पराग सैनी व पोलीस व पालिका कर्मचारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community