भजी विकली, लहानसहान कामे केली आणि असे घडले महा-उद्योगपती Dheerubhai Ambani

227

धीरजलाल हिरालाल अंबानी, ज्यांना धीरूभाई अंबानी (Dheerubhai Ambani) म्हणूनही ओळखले जाते. ते प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते, ज्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. धीरूभाई अंबानी ही अशी व्यक्ती होती ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि भलं मोठं डोंगर उभं केलं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धीरूबाईंनी एकेकाळी पेट्रोल पंपावर ३०० रुपये पगारावर काम केले होते. पण त्यांच्या कष्टाचं फळ पाहा, जेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांची संपत्ती ६२ हजार कोटींहून अधिक होती.

धीरूभाई अंबानी (Dheerubhai Ambani) यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढजवळील चोरवाड या छोट्याशा गावात एका सामान्य शिक्षकाच्या घरी झाला. त्यांची आई जमनाबेन गृहिणी होती आणि वडील गोर्धनभाई अंबानी हे एक सामान्य शिक्षक होते. पण त्यांच्या नोकरीत घर चालवणे कठीण होऊन बसले. अशा परिस्थितीत धीरूभाई अंबानी (Dheerubhai Ambani) यांना त्यांचे हायस्कूलचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी वडिलांसोबत भजी देखील विकली आहे, त्याचबरोबर इतर लहानसहान कामे केली.

(हेही वाचा Crime : मुख्यमंत्री योगी नंतर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आता मुखमंत्री मोहन यादव बनले ‘बुलडोझर बाबा’)

कोणाला माहित होतं की हा सामान्य कुटुंबातील सामान्य वाटणारा मुलगा पुढे जाऊन भारताचा सर्वात मोठा उद्योगपती होईल. धीरूभाईंचे मोठे भाऊ रमणिक भाई त्या काळात येमेनमध्ये काम करायचे. त्यांच्या मदतीने धीरूभाईंनाही येमेनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी ‘ए. ‘बेस्सी अँड कंपनी’मध्ये पेट्रोल पंपावर ३०० रुपये प्रति महिना पगारावर काम केले. धीरुभाई जिथे काम करायचे तिथे २५ पैशात चहा मिळायचा. मात्र ते जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन १ रुपयात चहा प्यायचे. कारण तिथे मोठमोठे उद्योगपती यायचे. म्हणून ते उद्योगविषयीच्या चर्चा ऐकायला जायचे.

१९५८ मध्ये, धीरूभाई भारतात परतले आणि १५००० रुपयांच्या भांडवलासह रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन सुरू केले. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचा प्राथमिक व्यवसाय पॉलिस्टर धाग्याची आयात आणि मसाल्यांची निर्यात हा होता. पुढे त्यांनी १९६६ रोजी अहमदाबादमध्ये कापड गिरणीची सुरुवात केली आणि असं करत ते भारताचे सर्वोच्च उद्योगपती झाले. आज त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मुकेश अंबानी त्यांचा वारसा स्दक्षमपणे पुढे नेत आहेत. धीरुभाई अंबानी भारतीय तरुणांचे प्रेरणास्रोत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.