बुधवार २७ डिसेंबर रोजी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांची भेट घेतली तेव्हा पुतीन यांनी भारत आणि रशियाच्या मैत्रीचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले पुतीन ?
रशिया (Vladimir Putin) आणि भारताची मैत्री अनेक दशके जुनी आहे आणि आता ही मैत्री आणखी मजबूत झाली आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी या मैत्रीला अधिक बळ दिले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : भाजपकडून राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव; मुंबईतील प्रत्येक वार्डात दीपोत्सव)
मी माझे मित्र पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो – राष्ट्राध्यक्ष पुतीन
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) म्हणाले, “जगभरातील सर्व अशांतता असूनही, आशियातील भारताशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे जात आहेत. .. मी त्यांना युक्रेनमधील परिस्थितीबद्दल अनेकदा सांगितले आहे. मला माहित आहे की पंतप्रधान मोदी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहे.”आमचे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी जेव्हा रशियाला भेट देतील तेव्हा याचा आम्हाला आनंद होईल. आमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते कृपया त्यांना सांगा. मला माहीत आहे की पुढील वर्षी भारतात राजकीय घडामोडी आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मी माझे मित्र पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो की ते चांगले काम करतील.”
(हेही वाचा – Accident : मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेने बसला आग, 12 जणांचा होरपळून मृत्यू)
Honoured to call on President Vladimir Putin this evening. Conveyed the warm greetings of PM @narendramodi and handed over a personal message.
Apprised President Putin of my discussions with Ministers Manturov and Lavrov. Appreciated his guidance on the further developments of… pic.twitter.com/iuC944fYHq
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) December 27, 2023
‘राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना भेटणे हा माझा सन्मान आहे “, असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि वैयक्तिक संदेश पाठवला. मंत्री मंटुरोव आणि लावरोव्ह यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेची माहिती राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना दिली. आमच्या संबंधांच्या पुढील विकासासाठी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाची प्रशंसा केली.
(हेही वाचा – Coronavirus : भारतात २४ तासांत ५२९ कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू)
दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चेचा एक भाग म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २५ ते २९ डिसेंबर दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर आहेत. युक्रेनमधील परिस्थितीसह जटिल जागतिक घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर पुतीन (Vladimir Putin) यांनी भर दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community