Ratan Tata : भारतीय उद्योगाचे रत्न

टाटा समूहाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आज भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. ते फोर्ड फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य देखील आहेत. आज वयाच्या ८५ व्या वर्षी देखील ते सक्रियपणे कार्य करतात. सामाजिक कार्यातही पुढाकार घेतात. भारतीय जनतेने रतन टाटा यांच्यावर नेहमीच प्रेम केले आहे.

502
Ratan Tata : भारतीय उद्योगाचे रत्न

रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा होते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी रतन यांना दत्तक घेतले होते. रतन टाटा यांच्या आजी आणि जमशेदजी टाटा यांच्या पत्नी हीराबाई या बहिणी होत्या. रतन टाटा फक्त १० वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल आणि आई सोनू एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण सर रतनजी टाटा यांच्या विधवा नेवजाबाई टाटा यांनी केले, ज्यांनी रतन यांना दत्तक घेतले.

रतन टाटा (Ratan Tata) यांनी आठवीपर्यंत मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. १९५५ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क शहरातील रिव्हर डेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई आणि बिशप कॉटन स्कूल, शिमला येथेही शिक्षण घेतले होते. टाटांनी १९५९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली. १९७५ मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या ७ आठवड्यांच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात प्रवेश घेतला होता.

(हेही वाचा – Zomato GST Notice : जीएसटी न भरल्याने झोमॅटोला 400 कोटींची कारणे दाखवा नोटीस)

रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नेल्को आणि सेंट्रल इंडिया टेक्सटाइल्स सारख्या कंपन्या सांभाळल्या. त्यात त्यांना चांगलेच यश लाभले. त्यानंतर वर्षानुवर्षे त्यांनी टाटा समूहाचा अनेक क्षेत्रात विस्तार केला आणि यश संपादन केले. १९९१ मध्ये रतनजी दादाभॉय टाटा यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली. त्यानंतर रतन टाटा यांना टाटा सन्सचे अध्यक्ष घोषित करण्यात आले.

टाटा इंडिका प्रकल्पाचे श्रेय रतन टाटा यांनाच जाते. ही देशातील पहिली कार होती, ज्याच्या डिझाईनपासून उत्पादनापर्यंतचे काम एका भारतीय कंपनीने केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा टी, टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स यांनीही लक्षणीय प्रगती केली. (Ratan Tata)

(हेही वाचा – Nashik Ganja seized : नाशिकमधून तब्बल ३८ लाखांचा गांजा जप्त)

टाटा समूहाची (Ratan Tata) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आज भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. ते फोर्ड फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य देखील आहेत. आज वयाच्या ८५ व्या वर्षी देखील ते सक्रियपणे कार्य करतात. सामाजिक कार्यातही पुढाकार घेतात. भारतीय जनतेने रतन टाटा यांच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. रतन टाटा (Ratan Tata) हे खरोखरच उद्योग क्षेत्रातले रत्न आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.