केंद्र सरकारने (Central Govt) देशातील गरीब वर्गाचा पैसा बॅंकेत सुरक्षित रहावा; म्हणून प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) कार्यान्वित करण्यात आली. ही योजना आणल्यानंतर दुर्बल आर्थिक विभागातील लोकांचा पैसा या निमित्ताने बॅंकेत आला. आता मात्र या योजनेतील 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रीय (accounts inactive) झाली आहेत.
(हेही वाचा – Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश)
राज्यसभेत (Rajya Sabha) एका प्रश्नाला उत्तर देतांना वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी ही माहिती दिली आहे. भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले की, ”या योजनेअंतर्गत देशभरात एकूण 51.11 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 10 कोटी अशी खाती आहेत, ज्यात गेल्या काही वर्षांत कोणताही व्यवहार झालेला नाही. अशा स्थितीत ही खाती निष्क्रीय (accounts inactive) झाली आहेत. निष्क्रीय खात्यांमध्ये महिला खातेदारांची संख्या 4.93 कोटी आहे. या निष्क्रीय खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही.”
20 टक्के खाती निष्क्रीय
संसदेत पीएम जन धन खात्याबद्दल (PM Jan Dhan Yojana) महत्त्वाची माहिती देतांना भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले की, या योजनेअंतर्गत देशभरात 51 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. परंतु त्यांपैकी 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रीय आहेत. ही संख्या एकूण खात्यांच्या 20 टक्के इतकी आहे. एकूण निष्क्रीय बँक खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची आहेत.
(हेही वाचा – Uddhav Thackeray : हनुमानगढीचे महंत यांची उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका, जो राम का नही हो सका, वो…)
पीएम जनधन खात्यांचा सरकारला लाभ
पीएम जन धन योजनेअंतर्गत (PM Jan Dhan Yojana) तुम्ही शून्य शिल्लक असतांना खाते उघडू शकता. या योजनेमुळे सर्व समाजघटकांतील लोकांनी बॅंकेत खाते उघडल्यामुळे सरकारला लाभ झाला. अन्य अनेक योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित करण्यात या खात्यांची मदत झाली आहे.
खाती निष्क्रीय का होतात ?
निष्क्रीय पीएम जनधन खात्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही वित्त राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले. अनेक वेळा खात्यांत बराच काळ व्यवहार न झाल्यास ते निष्क्रीय होते. एखाद्या खात्यात दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार होत नसल्यास, असे खाते आपोआप निष्क्रीय होते. (PM Jan Dhan Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community