Hafiz Saeed : हाफिज सईदला आमच्याकडे सोपवा; पाकिस्तानकडे केली औपचारिक मागणी

Hafiz Saeed : दहशतवादी हाफिज सईदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

248
Hafiz Saeed : हाफिज सईदला आमच्याकडे सोपवा; पाकिस्तानकडे केली औपचारिक मागणी
Hafiz Saeed : हाफिज सईदला आमच्याकडे सोपवा; पाकिस्तानकडे केली औपचारिक मागणी

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला (Hafiz Saeed) अटक करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानकडे हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याची मागणी केली आहे. हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानकडे औपचारिक विनंती करण्यात आली आहे. ‘इस्लामाबाद पोस्ट’ (Islamabad Post) या पाकिस्तानी दैनिकाने ही बातमी दिली आहे. अमेरिकेने यापूर्वीच १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येच्या भव्य श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनाच्या दिवशी देशभरात ५० हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता)

२०१९ पासून आहे तुरुंगात

हाफिज सईद (Hafiz Saeed) हा २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा (26/11 Mumbai attacks) मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेनेही या गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्यावर १० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. सध्या लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) संस्थापक हाफिज मोहम्मद सईद बंदी घातलेल्या जमात-उद-दावाच्या (JUD) इतर काही नेत्यांसह २०१९ पासून तुरुंगात आहे.

दहशतवादाला हवालाच्या माध्यमातून अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आघाडीची संघटना आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय)

पाकिस्तानातील निवडणुका लढवणार

हाफिज सईद २०१९ पासून पाकिस्तानातील तुरुंगात आहे, परंतु आजही तो राजकारणापासून सैन्यापर्यंत सत्तेत आहे. दहशतवादी हाफिज सईदचा पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) देखील पाकिस्तानात फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवत आहे. यावरून पाकिस्तानमधील त्याच्या प्रभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी देशभरातील प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

२ प्रकरणांमध्ये आहे दोषी

हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. हाफिज सईदचा मुलगा लाहोरमधून निवडणूक लढवत आहे. मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला नोव्हेंबर 2020 मध्ये पंजाबच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला अर्थपुरवठा करण्याच्या २ प्रकरणांमध्ये १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आणि त्याला १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला. (Hafiz Saeed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.