Rahul Gandhi : राहुल गांधींचे भाषण; व्यासपिठावर नेत्यांच्या डुलक्या

जेव्हा Rahul Gandhi भाजप आणि मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक आरोप करत होते, तेव्हा मंचावर बसलेले अनेक नेते त्यांचे भाषण ऐकण्याऐवजी मोबाईलवर बघतांना किंवा बोलतांना दिसले. काही नेते डुलक्याही घेत होते.

230
Rahul Gandhi : राहुल गांधींचे भाषण; व्यासपिठावर नेत्यांच्या डुलक्या
Rahul Gandhi : राहुल गांधींचे भाषण; व्यासपिठावर नेत्यांच्या डुलक्या

काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नागपूर येथे मोठी सभा झाली. या वेळी राहुल गांधी यांनी ‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर 2 विचारधारांसाठी आहे. यामध्ये एका विचारसरणीला देशात फॅसिझम वाढवायचा आहे, तर दुसरी विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे समर्थन करते. भाजपचे अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत. अशाच एका नेत्याने त्यांना सांगितले की, भाजपमध्ये केवळ गुलामगिरी चालते आणि कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला तिथे बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसमध्ये (Congress) याच्या उलट आहे आणि काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालते’, अशा प्रकारे त्यांनी भाजपवर तीच तीच टीका केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार)

भाषणाच्या वेळी नेत्यांच्या डुलक्या

जेव्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) भाजप (BJP) आणि मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक आरोप करत होते, तेव्हा मंचावर बसलेले अनेक नेते त्यांचे भाषण ऐकण्याऐवजी मोबाईलवर बघतांना किंवा बोलतांना दिसले. काही नेते डुलक्याही घेत होते. कॅमेरे चालू असल्यामुळे ते मध्ये मध्ये राहुल गांधींच्या वाक्यांवर डोळे उघडून टाळ्या वाजवण्याची औपचारिकता करत होते. असे असूनही अनेक नेत्यांना राहुल गांधी यांचे भाषण बोजड वाटत असल्याचे माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले.

(हेही वाचा – Hafiz Saeed : हाफिज सईदला आमच्याकडे सोपवा; पाकिस्तानकडे केली औपचारिक मागणी)

काँग्रेस मोदी सरकारला रोखणार का ?

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यासाठी युतीतील जागावाटप आणि समान जाहीरनाम्यासाठी चर्चा सुरू आहे. यासह काँग्रेसही आपल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात जनसंपर्क मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. पक्षाने 14 जानेवारीला भारत न्याय यात्रा (Bharat Nyaya Yatra) काढण्याची घोषणा केली आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत होणार आहे. (Rahul Gandhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.