महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २ डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहे.
(हेही वाचा Madarasa : मराठी शाळा पडतायेत बंद सरकार मात्र मदरशांवर करतंय लाखो रुपयांचा खर्च)
काही दिवसांपूर्वी सी वोटर संस्थेने राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे मतदानपूर्व अंदाज जाहीर केले. या सर्वेक्षणात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गरज निर्माण झाली आहे. मनसेने स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल, याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे.
Join Our WhatsApp Community