CEO Chanda Kochhar: चंदा कोचर आणि इतर ९ जणांवर ‘टोमॅटो पेस्ट’ कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

374
CEO Chanda Kochhar: चंदा कोचर आणि इतर ९ जणांवर 'टोमॅटो पेस्ट' कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
CEO Chanda Kochhar: चंदा कोचर आणि इतर ९ जणांवर 'टोमॅटो पेस्ट' कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

‘टोमॅटो पेस्ट’ कंपनीची फसवणूक करून २७ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर (CEO Chanda Kochhar) आणि अन्य १० जणांविरुद्ध दिल्लीत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२००९ सालचे हे प्रकरण असून याप्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने ९ डिसेंबरला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यावरून चंदा कोचर, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संदीप बक्षी, आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापक विजय झगडे, ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या मुंबईतील ‘ग्लोबल ट्रेड सर्व्हिसेस युनिट’चे अज्ञात अधिकारी, ‘पंजाब नॅशनल बँके’चे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अतुलकुमार गोयल, ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’चे (ओबीसी) माजी सरव्यवस्थापक के. के. बोर्डिया, ‘पीएनबी’चे सहसरव्यवस्थापक आणि तत्कालीन ‘ओबीसी’चे शाखा प्रमुख अखिला सिन्हा आणि ‘ओबीसी’चे माजी मुख्य व्यवस्थापक के. के. भाटिया यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Udayanaraje Bhosale: महापुरुषांची बदनामी रोखणारा कडक कायदा करा, उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी )

‘पी अँड आर ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड’चे (टोमॅटो मॅजिक) संचालक शम्मी अहलुवालिया यांनी तक्रार नोंदवली आहे. कंपनीला टोमॅटो पेस्टच्या निर्यातीची ऑर्डर मिळाली होती. त्यासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेने सल्लागार बँक म्हणून काम करताना ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’कडून ‘लेटर ऑफ क्रेडिट’ मिळवल्याचे भासवले. प्रत्यक्षात ‘लेटर ऑफ क्रेडिट’ रशियातील ‘आरबीएस अलायन्स’चे असल्याचे उघड झाले. ही बँक व्यवहारात अत्यंत कुख्यात आहे. या सर्व प्रकरणात कंपनीला २७ कोटी रुपयांचा तोटा झाला. याची कोणतीही जबाबदारी बँकांनी स्वीकारली नाही. त्यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.