नाताळ आणि नववर्षादरम्यान वाढणाऱ्या गर्दीमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा (JN. 1 Variant) शिरकाव झाला असल्याचे दिसत आहे.
अकोल्यात ‘कोरोना’चा सब व्हेरियंट JN.1सून सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हा रुग्ण अकोला शहरातील असून त्याची ५ डिसेंबरला त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर त्याच्या चाचणीचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. या तपासणीत रुग्णात JN.1 व्हेरिएंट विषाणू आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी )
या रुग्णाची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यासोबत त्याच्या परिवाराचीसुद्धा कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची प्रकृती ठिक असून त्यांच्या कुटुंबियात कोणीही पॉझिटिव्ह नाही. सध्या जिल्ह्यात किंवा शहरात एकही जेएन १ व्हेरिएंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी सांगितलं आहे.
हेही पहा –