ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी (Ind vs SA Test Match) सामन्यात भारताला तीनच दिवसांत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. सेंच्युरियनमध्ये ना भारताची फलंदाजी चालली, ना गोलंदाजी. आणि तिसऱ्याच दिवशी आफ्रिकन संघाने भारताचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. याचा फटका भारताला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीतही बसला आहे. भारतीय संघाची अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
दुसरीकडे, आफ्रिकन संघ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
A complete performance from the fast bowlers helps the hosts go 1-0 up in the #SAvIND Test series 🎉#WTC25 📝: https://t.co/Rma4l5S0RO pic.twitter.com/BggeNhDkSp
— ICC (@ICC) December 28, 2023
‘कसोटी सामना (Ind vs SA Test Match) जिंकायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन चांगली कामगिरी करावी लागते. आमच्यातील अनेकांनी यापूर्वी आफ्रिकेचा दौरा केलेला आहे. इथली खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज सगळ्यांना होता. तरीही आम्ही चांगला खेळ करण्यात कमी पडलो. दोन्ही डावांमध्ये फलंदाज कमी पडले. आणि गोलंदाजीत बुमराला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही,’ असं कर्णधार रोहीत शर्माने बोलून दाखवलं.
(हेही वाचा-Rajesh Khanna : मुलींनी रक्ताने प्रेम पत्रे पाठवली; पहिला सुपरस्टार राजेश खन्ना)
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. पहिल्या डावापासूनच भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. पण, के एल राहुलच्या १०१ धावा आणि कोहली ३८ तर श्रेयस अय्यर ३१ यांच्यामुळे भारतीय संघाने निदान २४६ अशी बऱ्यापैकी धावसंख्या उभारली.
भारतीय फलंदाजांना त्रास देणाऱ्या खेळपट्टीवर आफ्रिकन संघाने मात्र ४०८ धावा केल्या. आपली शेवटची मालिका खेळणाऱ्या डिन एल्गरने दमदार १८४ धावा केल्या. तर यानसेनने ८४ धावा करून त्याला चांगली साथ दिली. यानंतर भारताचा दुसरा डावही १३१ धावांत गुंडाळला गेला. यात एकट्या विराट कोहलीच्या होत्या ७६ धावा. म्हणजे इतर फलंदाज फक्त हजेरी लावून परतले.
आफ्रिकन संघाने आता मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाऊन इथं होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community