ऋजुता लुकतुके
भारतीय महिलांची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Ind W vs Aus W 1st ODI) सुरुवात पराभवाने झाली आहे. ६ बाद २८२ ही आपली सर्वोत्तम धावसंख्या रचूनही नंतर ऑसी महिलांना रोखण्यात भारतीय गोलंदाजी कमी पडली. खरंतर ऑस्ट्रेलियन डावाच्या पहिल्याच षटकांत एलिसा हिली शून्यावर बाद झाली होती. पण, त्यानंतर फिबी लिचफिल्ड (७८) आणि एलिस पेरी (७५) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १४८ धावांची भागिदारी रचली.
पुढे बेथ मूनीच्या ४८ आणि ताहलिया मॅग्राच्या नाबाद ६८ धावांमुळे ऑस्ट्रेलियन महिलांनी ४६ व्या षटकातच २८५ धावांचा टप्पा पार केला.
A comfortable victory for Australia as they go 1-0 up in the three-match ODI series.#INDvAUS | 📝: https://t.co/USmOKQ4xm5 pic.twitter.com/aRQQTf69ML
— ICC (@ICC) December 28, 2023
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजी कमी पडली. कर्णधार हरमनप्रीतच्या ३ षटकांतही ३२ धावा निघाल्या.
त्यापूर्वी भारतीय महिलांनी २८२ धावांची मजल मारली ती जेमिमा रॉडरिग्जच्या ८२ धावा आणि पूजा वस्त्राकारने तिला दिलेल्या चांगल्या साथीमुळे. जेमिमाचं मागच्या चार एकदिवसीय सामन्यांतील हे दुसरं अर्धशतक होतं. तर तिने पूजाबरोबर आठव्या गड्यासाठी केलेल्या ६८ धावांच्या भागिदारीमुळेच भारतीय संघ अडिचशेचा टप्पा गाठू शकला.
पूजा वस्त्रकारने ६२ धावा केल्या त्या ४६ चेंडूंत. यात तिने ८ चौकार आणि २ षटकार खेचले. यास्तिका भाटियानेही ४९ धावा केल्या.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community