अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) श्री राम लल्लाची नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे. राम मंदिरात स्थापित होणारी राम लल्लाची नवीन मूर्ती ही जगातील सर्वात अनोखी मूर्ती असेल. नव्या पुतळ्यात राम लल्लांचा अभिषेक होणार आहे तसेच राम मंदिराच्या गर्भगृहात नवीन मूर्तीसोबत राम लल्लाची जुनी मूर्तीही बसवण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून भाविक पूजा-अर्चना करत आलेल्या मूर्तीची नवीन श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार नाही. ही मूर्ती स्वयंभू असल्याचा दावा वादाच्या काळात वकिलांनी नेहमीच केलेला आहे. त्याविषयी राय यांनी सविस्तर माहिती दिली. नवीन मंदिरात उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. ही मूर्ती हलवता येणार आहे.
निर्माणाधीन मंदिरात श्री रामलल्लाची किती मोठी मूर्ती असेल? ती कोणत्या दगडापासून तयार केली जाणार आहे? याबद्दल संतांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. मंदिरात श्रीरामांची बालमूर्ती असेल, असे राय यांनी सांगितले. श्रीरामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, मूर्ती हलवल्यानंतर मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करावी लागते. ही मूर्ती अस्थायी रूपाने आणण्यात आली. तेव्हाही मूर्तीची प्रतिष्ठापना करावी लागली. ही मूर्ती मंदिरात विराजमान आहे. या भागातून ही मूर्ती भव्य मंदिरात जाईल. त्यावेळी देखील प्रतिष्ठापना करावी लागेल, असा नियम आहे. आपापली भावना आहे, परंतु रामलल्ला आज या स्थितीत आले आहेत. तेही त्यांच्यामुळेच शक्य होऊ शकले. या मूर्तीनंतर तयार केल्या जाणाऱ्या मूर्ती आकर्षक, सुंदर असू शकतात. त्यांची प्राणप्रतिष्ठाही होऊ शकते, परंतु या मूर्तीला असलेले महत्त्व इतर मूर्तीला नसेल. कारण सध्याची मूर्ती स्वयंभू आहे.
(हेही वाचा – Parliament Attack: संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट होणार, 2 जानेवारीपासून सुनावणी)
मूर्ती बदलणे रामभक्तांचा अपमान
महंत धर्मदास म्हणाले, १९४९ मध्ये भगवान स्वयं प्रकट झाले होते. म्हणूनच या स्वयंभू मूर्ती आहेत. त्यांची १९४९ पासून पूजा केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिरात विराजमान रामलल्लास समस्त वैधानिक अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता मूर्ती बदलणे सर्व रामभक्तांचा अपमान ठरेल, असे महंत धर्मदास यांनी म्हटले आहे.
मूर्तींची नावे…
नवीन मूर्तीला अचल मूर्ती, तर जुन्या मूर्तीला उत्सवमूर्ती असे म्हटले जाणार आहे. श्रीरामाशी संबंधित सर्व उत्सवांमध्ये केवळ उत्सवमूर्ती मिरवणुकीत ठेवल्या जातील. नवीन मूर्ती भाविकांना गर्भगृहात पाहायला मिळतील.
नवीन मूर्ती ५१ इंच उंच
राम लल्लाच्या जुन्या मूर्तीची उंची खूपच कमी असल्याने भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता येत नाही. श्रीरामाच्या बालस्वरुपाच्या नवीन मूर्ती ५१ इंच उंच असतील. भाविकांना ३५ फूट अंतरावरूनही मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. ५ वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर ठेवून बनवली जाणार आहे.
मूर्तीतील वैज्ञानिक रहस्ये…
भगवान श्रीरामाची मूर्ती अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून या मूर्तीत वैज्ञानिक रहस्यांचाही समावेश आहे. यासाठी एक उपकरण तयार केले जात आहे. हे उपकरण मंदिराच्या शिखरावर बसवले जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणे वाद्याच्या माध्यमातून थेट रामाच्या डोक्यावर पडणार आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community