अयोध्येत अलौकिक आणि दिव्यत्वाने भारलेल्या प्रभु श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुख्य मंदिरात भगवान श्रीराम विराजमान झाल्यानंतर येथे येणाऱ्या भक्त-भाविकांना ऋषिमुनींचे दर्शनही होणार आहे. मुख्य राम मंदिराव्यतिरिक्त (Ram Mandir) येथे ७ देवीदेवतांची मंदिरे बांधली जाणार आहेत. यामुळे मंदिर परिसराची शोभा वाढायला नक्कीच मदत होईल.
अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिराच्या भव्य प्रांगणात भारतातील ऋषिमुनींची मंदिरेही उभारली जाणार आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील भागात अगस्त्य ऋषि, विश्वामित्र ऋषि, वसिष्ठ ऋषि, महर्षी वाल्मिकी यांची मंदिरे असतील, तर प्रभु श्रीराम वनवासात असताना त्यांच्या संपर्कात आलेल्या अहिल्यादेवी, माता शबरी, यांची मंदिरेही बांधली जाणार आहेत याशिवाय निषाद राजाचे मंदिरही बांधण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी भगवान श्रीरामासह थोर ऋषिमुनी आणि देवीदेवतांचे दर्शनही घेता येईल. याशिवाय मंदिरात ‘जटायू’ची मूर्तीही तयार करण्यात आली आहे तसेच सूर्यदेवता, गणपती, श्री भवानी देवी, शिव आणि मारुतीचे मंदिरही येथे बांधले जाणार आहे. अशा प्रकारे मुख्य मंदिरापासून काही अंतरावर आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मंदिरेही उभारली जातील. यामुळे मंदिराचे दर्शन घेताना भाविकांना त्रेतायुगाची आठवण होईल.
(हेही वाचा –Mantralaya : मंत्रालयात ‘इयर एण्ड मूड’; अधिकारी-कर्मचारी नसल्याने पूर्णतः शुकशुकाट )
‘त्रेतायुग’ संकल्पनेवर आधारित सजावट
अयोध्येतील मंदिराची सजावट ‘त्रेतायुग’ या संकल्पनेनुसार केली जात आहे. त्याकरिता अयोध्येत सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कॉरिडॉरच्या बाजूनेही विविध मंदिरे बांधली जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत नवीन राम मंदिरात नवीन राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भव्य राम मंदिराला आयताकृती कुंपण असणार आहे.
दक्षिण दिशेला मारुती, उत्तरेकडे अन्नपूर्णा देवी
मंदिराच्या सभोवताली असलेल्या उद्यानाचे चारही कोपरे सूर्यदेव, माता भगवती, भगवान गणेश आणि भगवान शिव यांना समर्पित करण्यात आले आहेत. उत्तर दिशेला अन्नपूर्णा देवीचे मंदिर बांधण्यात येणार आहे. दक्षिण बाजूला भगवान हनुमानाचे मंदिर असेल. उत्तरेकडील कोपऱ्यात माता अन्नपूर्णाचे मंदिर बांधले जाईल. अयोध्येतील कुबेरटीलावर जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.
रस्त्यांच्या कडेला सूर्य स्तंभ
अयोध्येला रस्त्यांच्या कडेला सूर्य स्तंभ लावण्यात येणार आहेत. हे स्तंभ म्हणजे भगवान श्रीराम सूर्यवंशी असल्याचे प्रतीक आहेत. या स्तंभांना रामपथ, भक्तिपथ, धर्मपथ आणि श्री रामजन्मभूमी पथ अशी नावे देण्यात आली आहेत त्याशिवाय रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या भिंतींवर रामायणकालिन प्रसंगांचे दर्शन घेता येईल. या भिंती फाइन क्ले म्युरल कलाकृतींनी सजवण्याचे काम सुरू आहे. त्यावर चित्रकला, सजावटीचे काम सुरू आहे. मंदिराच्या ७० एकर परिसरात हिरवळ असेल. या हरित पट्ट्यात सुमारे ६०० झाडे लावण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Ramanand Sagar : रामायण मालिकेसारखी अजरामर निर्मिती करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रामानंद सागर)
१२ प्रवेशद्वार
श्री राम मंदिर १२ एक परिसरात विस्तारलेले आहे. तीन मजल्यांचे हे मंदिर असून त्याची उंची १६२ फूट आहे. सिंह द्वारातून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक मुख्य प्रवेशद्वार असेल. या प्रवेशद्वारातून भाविकांना प्रवेश करता येईल. याशिवाय ‘सिंह’द्वारही मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असेल. राम मंदिराला एकूण 392 खांब असतील. गर्भगृहात 160 खांब आणि वरच्या मजल्यावर 132 खांब आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community