सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबईकरांच्या या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जय्यत तयारी केली आहे. यंदाच्या थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी (thirty-first celebration) बंदोबस्त कामी जवळपास १३ हजार मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) राज्य राखीव दलाच्या तुकड्या, शीघ्रकृती दल, होम गार्ड आणि दंगल नियंत्रण पथक देखील रस्त्यावर तैनात राहणार आहे. (Mumbai Police)
थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी मुंबई सजली आहे, मुंबईतील समुद्र किनारे, गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), शहरातील हॉटेल्स, रेस्टोरंट, डिस्को पब, मॉल विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी यंदा दोन दिवसांपूर्वी मुंबई सजली आहे. मुंबईतील इमारतीचे टेरेस, क्लब हाऊसमध्ये सह घरोघरी थर्टीफर्स्टच्या पार्ट्याचे नियोजन सुरू आहे. मुंबईतील थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचा (thirty-first celebration) आनंद घेण्यासाठी ठाणे, नवी मुंबई शहरातील नागरिक देखील मुंबईकडे कूच करतात. मुंबईकरांच्या या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या मदतीने काठमांडू येथे अडकलेले ५८ भाविक मायदेशी परतले)
रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई
यंदाच्या थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन (thirty-first celebration) बंदोबस्तासाठी २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, २ हजार ५१ पोलीस अधिकारी, ११ हजार ५०० पोलीस अंमलदार, ४६ राज्य राखीव दलाच्या तुकड्या, ३ रॅपिड फोर्स आणि १५ जलद गती पथक बंदोबस्ता साठी तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यासाठी अडीज हजार वाहतूक पोलीस शहरात तैनात असणार आहेत. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहेत. (Mumbai Police)
“ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहिम
त्याचप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन व “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” (Drunk and Drive) विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विक्री आणि सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांचे विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन मुंबई पोलीस दलाकडून (Mumbai Police Force) करण्यात आले आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community