अयोध्येत बांधण्यात आलेले नवीन विमानतळ महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Ram Mandir) अयोध्या धाम म्हणून ओळखले जाईल. ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे.
या विमानतळाबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत ८२१ एकरवर हे विमानतळ बांधण्यात आले आहे. या विमानतळाचे पहिले उड्डाण ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सध्या अयोध्येतून दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू या प्रमुख शहरांसाठी उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा –MCOCA Act : गँगस्टर इलियास बचकाना सह ७ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई )
या विमानतळाबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत ८२१ एकर परिसरात बांधलेल्या या विमानतळाचे काम पहिल्या टप्प्यात ६५,००० चौरस फुटांचे टर्मिनल बांधण्यात आले आहे. धावपट्टी २,२०० मीटर लांब असून तिची क्षमता प्रति तास २-३ फ्लाइट्स आहे. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
१५ किमी अंतरावर रोड शोचं आयोजन
अयोध्येत ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. यावळी विमानतळ ते रेल्वे स्थानकापर्यंत १५ किमी अंतरावर रोड शोचं आयोजन केलं आहे. याच मार्गावर धर्मपथ आणि रामपत असेल. नवीन विमानतळाला ३० टन फुलांनी सजवले जाणार आहे. त्याकरिता ८०० कारागीर व्यस्त आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community