उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शिरूर मतदारसंघात दंड थोपटत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं आहे. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची निवड केल्याने चुलत्याकडून पुतण्याला लक्ष केलं जातंय का? (Ajit Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षाच्या कार्यकारिणी जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाच्या कर्जत युवक तालुकाध्यक्षपदी संतोष उर्फ पप्पू धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येतील नवीन विमानतळाला ३० टन फुलांची सजावट, ८०० कारागीर व्यस्त)
कर्जत जामखेड मतदार संघाचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात कर्जत येथे अजित पवार गटाकडून तालुका अध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. यामध्ये संतोष उर्फ पप्पू धुमाळ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका अध्यक्ष या पदावर निवड झाली आहे.यावरून आता पुतण्याच्या विरोधात म्हणजे रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.शिरूर लोकसभा मतदार संघानंतर आता कर्जत जामखेड कडे अजित पवार यांनी लक्ष देण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community