कात्रज येथील जांभुळवाडीकडील नवीन बोगद्याच्या आतमध्ये दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यादरम्यान एक चारचाकी वाहन अचानक थांबल्यामुळे त्याच्या पाठी मागे असलेली चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात (Accident) झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नसून वाहनांचे नुकसान झालेले आहे.
दरम्यान घटनास्थळी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, तसेच वाहतूक विभागाकडील अंमलदार तात्काळ दाखल झाले असून अपघातग्रस्त (Accident) वाहने बाजूला करण्यात आली आहेत, तसेच वाहतूकही सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नसले तरी प्राथमिकदृष्ट्या चालकाचे गाडीवरील नियत्रंण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे दिसत आहे. या अपघातात कोणती जिवीतहानी झाली कि नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community