Girish Mahajan : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकार देणारच

मराठा समाजाला टिकणारा आरक्षण हे दिलं जाणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही वेळ द्यावा, म्हणजे त्यांचा प्रश्न हा पूर्ण मार्गी लागेल, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

193
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

मराठा समाजाला टिकणारा आरक्षण हे दिलं जाणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला काही वेळ द्यावा, म्हणजे त्यांचा प्रश्न हा पूर्ण मार्गी लागेल, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. १२ जानेवारी रोजी नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला आहे त्यानिमित्ताने भव्य सभा होणार आहे. त्या मैदानाची पाहणी करण्यासाठी महाजन हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्यावेळी त्यांच्या समावेत शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आ. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, नाना शिलेदार, गोविंद बोरसे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Girish Mahajan)

मैदानाची पाहणी केल्यानंतर महाजन (Girish Mahajan) पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मराठा समाजासाठी (Maratha society) जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला आहे तो कौतुकास्पदच आहे. यामध्ये कुठलीही शंका नाही ते आत्तापर्यंत राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या मुदतीमुळेच सरकार या प्रकरणावर ती अंतिम कार्य करण्यापर्यंत पोहोचले आहे येणाऱ्या काळात हे कार्य पूर्ण होईल. अजून काही संधी द्यावी म्हणजे त्यानंतर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचे जनजीवन हे फार गतिमान आहे. त्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबईत ट्रॅक्टरसह येण्याचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुंबईच्या जनजीवन वरती परिणाम होऊ शकतो आणि त्यांनी असे करू नये, कारण आज मुंबई आणि महाराष्ट्राची प्रतिमा ही वेगळी आहे याचे भान त्यांनी ठेवावे आणि सरकारला मदत करावी असे आवाहन देखील त्यांनी केले. (Girish Mahajan)

(हेही वाचा – MNS : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना शिंदे गटाची ऑफर)

जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये न येता सरकारला थोडा वेळ वाढवून द्यावा 

गिरीश महाजन (Girish Mahajan) पुढे म्हणाले की, या सर्व प्रश्नावरती राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकारच ठाम आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकणारा आरक्षण हे समाजाला देणार आहे त्या दृष्टिकोनातून सरकारी पाऊल टाकत आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही आरक्षणातून कमी जास्त करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे. असे स्पष्ट करून ते म्हणाले की, जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईमध्ये न येता सरकारला थोडा वेळ वाढवून द्यावा म्हणजे त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील तेव्हा त्यांना मुंबईमध्ये येण्याची गरजच पडणार नाही. असे स्पष्ट करून गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणतात की सरकारला जर जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांनी वेळ दिला तर यातून खूप प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Girish Mahajan)

राम मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वरती टोला साधताना गिरीश महाजन म्हणाले की, राम मंदिराच्या निमंत्रणामध्ये केंद्र सरकारने (Central Govt) काही नियम ठरवले आहेत आम्ही मंत्री असून आम्हाला निमंत्रण नाही पण इतर काही मान्यवरांना निमंत्रण गेली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संख्याबळ कमी असल्यामुळे याद्या करायची त्यांना उशिरा निमंत्रण आला असेल परंतु त्यांनी जायचं की नाही आता हे त्यांचे ठरवावं, कारण ते आता काही राष्ट्रीय पक्ष नाही त्यामुळे त्याचा विचार त्यांनीच करावा असेही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, आता त्यांच्या पायाखालची वाळू चांगलीच सरकली आहे त्यामुळे ते काहीतरी भ्रमिष्ट झाल्यासारखे बोलत आहे त्यामुळे त्यांनी बोलताना संयम ठेवावा परमेश्वर त्यांना सुबृध्दी देवो हीच माझी प्रार्थना आहे. (Girish Mahajan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.