Deep Cleaning Drive : रविवारी महास्वच्छता अभियान, पण महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या अभियानासाठी महापालिकेच्या सफाई कामगार तसेच विविध कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.

1985
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत

मुंबईमध्ये येत्या रविवारी ३१ डिसेंबर रोजी महा स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या अभियानासाठी महापालिकेच्या सफाई कामगार तसेच विविध कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. मात्र एका बाजूला वर्षाच्या अखेरपर्यंत सुट्ट्यांचा नियोजन करून साप्ताहिक सुट्टीला जोडून दीर्घ सुट्टी घेत बाहेरगावी जात थर्टी फर्स्ट साजरी जाण्याचे नियोजन करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. रविवारीच होणाऱ्या या अभियानात सफाई कामगारांसह सर्व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना घरीच राहून थर्टी फर्स्ट साजरा करावा लागणार आहे. (Deep Cleaning Drive)

मुंबई महानगरात सुरु झालेली संपूर्ण स्वच्छता मोहीम ही लोकचळवळीत रुपांतरीत होत असून, येत्या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी महा स्वच्छता अभियान अर्थात मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्ह (Deep Cleaning Drive) च्या रुपात हा उपक्रम मुंबईत एकूण १० ठिकाणी राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे महा स्वच्छता अभियान प्रमुख कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. या ठिकाणी सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. गेट वे (Gateway of India) येथील कार्यक्रमात सुमारे २ हजार कामगार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनातील सर्व सफाई कामगार, मुकादम, कनिष्ठ आवेक्षक यासह विभाग कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या सर्व कामगार आणि अधिकारी यांना रविवारच्या या अभियानात सहभागी होण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. (Deep Cleaning Drive)

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : वंचित आघाडीचा संयम सुटला; दोन आठवड्यांची मुदत, अन्यथा ४८ जागा लढणार)

मुंबई बाहेर जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा बेत फसला

आधीच वर्ष अखेरीस शिल्लक राहिलेल्या सुट्टया घेण्याचे नियोजन करणाऱ्या कामगार,कर्मचारी व अधिकाऱ्यांना जोडून आलेल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचा फायद मिळाला आहे. या सुट्टीचा फायदा घेत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुंबई बाहेर जावून थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा बेत आखला होता. परंतु आयत्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महा स्वच्छता अभियान येत्या रविवारी घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे महापालिकेच्यावतीने हे अभियान रविवार घेण्यात येणा असल्याने या अभियानासाठी उपस्थित राहावे लागणार असल्याने सुट्टीचा बेतच रद्द करण्याची वेळ आला आहे. (Deep Cleaning Drive)

अवजार आणि वाहनांद्वारे कामगार राहणार उपस्थित

या महिन्यात प्रत्येक रविवारी एकाच परिमंडळांमध्ये ही स्वच्छता मोहिम राबवली जात होती, त्यामुळे या रविवारी एकाच परिमंडळातील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार होते, त्यामुळे ठराविक कर्मचाऱ्यांनी याची मानसिक तयारी ठेवली होती. परंतु रविवारी महा स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याने ९ विविध विभाग कार्यालयांमध्ये ही स्वच्छता राबवली जाणार आहे. तसेच गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gateway of India) मोठा कार्यक्रम आयोजित केल्याने याचे व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सादरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील स्वच्छतेचे हे मॉडेल राज्यात राबवले जाणार असून महापालिकेचे कामगार हे आपल्या सर्व अवजारांसह वाहने व इतर साहित्यांसह उपस्थित राहणार आहे. (Deep Cleaning Drive)

(हेही वाचा – असे दिसते अयोध्याधाम येथील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ)

कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

काही कामगार, कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) अचानक हे महास्वच्छता अभियानाची घोषणा केल्याने त्यासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. यापूर्वी याची कल्पना नसल्याने अनेक कामगार कर्मचारी हे सुट्टीवर गेले होते, त्यांना रविवारी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, त्यामुळे काही कर्मचारी हे शुक्रवारी बाहेरगावी निघणार होते, तेही कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसह नियोजन केले असले तरी रविवारच्या कार्यक्रमामुळे आपल्याला त्यातून माघार घ्यावी लागली आहे. तर काहींनी आपण जात नसलो तरी कुटुंब जात आहे. त्यामुळे आपल्याला घरीच राहून थर्टी फर्स्ट साजरा करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूण रविवारच्या या महा स्वच्छता अभियानामुळे काही कामगार, कर्मचारी व अधिकारी वर्गांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे. (Deep Cleaning Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.