अजित पवारांच्या आव्हानानंतर Supriya Sule अस्वस्थ; घेतला ‘हा’ निर्णय

490
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून अजित पवार गट बराच आक्रमक झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांपासून आमदार, खासदारांना तुम्ही ६० वर्षे ज्यांचे ऐकले आता माझे ऐका, मी तुमचे कल्याण करेन, असे म्हणाले आहेत. असेच पुतण्या रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड येथे दौरा करून संदेश दिला. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातही तयारी सुरु केली आहे. या सर्व प्रकारामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांना यंदाची लोकसभा निवडणूक जड जाणार हे लक्षात आल्यावर त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांनी बारामती मतदार संघाला लक्ष्य केले

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या मागील मागील १४ वर्षांत्यामुळे बारामती म्हणजे सुप्रिया सुळे असे समीकरण बनले आहे. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती मतदार संघाला लक्ष्य केले आहे. या ठिकाणी अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देणार, अशी चर्चा सुरु झाली होती. दरम्यान अजित पवार स्वतः बारामतीमध्ये दौरे करत आहेत. नुकतेच बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी तेथील स्थानिकांना आजवर तुम्ही ६० वर्षे ज्यांचे ऐकत आला, आता माझे ऐका, माझ्या पाठिशी या, असे म्हटले.

सुप्रिया सुळे १० महिने बारामतीतच राहणार 

अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत बारामती न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा व विधानसभेची निवडणूक होईपर्यंत म्हणजे पुढील 10 महिने मी बारामतीतच राहणार आहे. माझी गाडी मुंबईला जाणार नाही. मी माझा नवरा व मुलांनाही त्याची कल्पना दिली आहे. यापुढे माझ्या नवऱ्याला व मुलांना मला भेटायचे असेल तर इथे पुणे, बारातमी किंवा इंदापुरात यावे लागेल, असे सुप्रिया सुळे यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे. बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. हा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सत्ताधारी भाजपने अनेक प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण आता पवार कुटुंबातीलच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. त्यातच त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा लोकसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाल्याची चर्चा रंगली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.