Ayodhya Ram Mandir : भाविकांची आरतीसाठी ऑनलाईन पास बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या कुठे करायचे बुकिंग

आयोध्येत रामलल्लाच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी भाविकांच्या सेवेसाठी राम मंदिर ट्रस्ट च्या वतीने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

274
Ayodhya Ram Mandir : भाविकांची आरतीसाठी ऑनलाईन पास बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या कुठे करायचे बुकिंग
Ayodhya Ram Mandir : भाविकांची आरतीसाठी ऑनलाईन पास बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या कुठे करायचे बुकिंग

अयोध्येतील राम मंदिर येथे रामलल्लाच्या आरतीला उपस्थित राहता यावे यासाठी भाविकांच्या सेवेसाठी,राम मंदिर ट्रस्टच्या वतीने पाससाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष काउंटरवर रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही यासाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापाससाठी घरातून अर्ज दाखल करता येणे शक्य होणार आहे. अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्रकाश गुप्ता यांनी दिली आहे. (Ayodhya Ram Mandir)

राम मंदिराचे उद्घाटन जवळ येत असताना आणि 22 जानेवारी 2024 रोजी गर्दी लक्षात घेता ट्रस्ट ने हा निर्णय घेतला आहे.राम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्रकाश गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ट्रस्टने एकूण पासपैकी 20 ऑनलाइन पास  उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा शुक्रवार (३० डिसेंबर) पासून कार्यान्वित झाली आहे. रामलल्लाच्या आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या व्यक्ती पुढील तारखांसाठी त्यांचे पास आता घरबसल्या मिळवू शकतात. या मंदिरात दिवसातून तीन वेळा आरत्या होतात त्यापैकी प्रत्येकासाठी एकावेळी  वीस पास ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही संकेतस्थळाला भेट देऊ शकतो आणि पुढील तारखेसाठी पास मिळवू शकतो. (Ayodhya Ram Mandir)

भाविकांनी मनापासून केले स्वागत

ऑनलाईन पास अर्ज प्रणाली लागू करण्याच्या ट्रस्टच्या निर्णयाचे भाविकांनी मनापासून स्वागत केले आहे. जनतेला त्यांच्या घरातून आरामात पास मिळवण्याच्या सुविधेचा फायदा होईल, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल. तर यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काही भक्तांनी सांगितले की,ऑनलाईन आरती पास अर्ज केवळ वेळ वाचवत नाहीत तर सर्व व्यवस्था झाल्यानंतर व्यक्तींना त्यांचे वेळापत्रक ठरवणेही सोपे जाणार आहे.

(हेही वाचा : Mumbai-Pune Expressway :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय)

राममंदिराचे ऑनलाईन पास कसे बुक करावे, आरतीची वेळ जाणून घ्या

  • ऑनलाईन पास बुक करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी, https://srjbtkshetra.org/वर उपलब्ध असलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या अधिकृत संकेतस्थळावर पास काढता येणार आहे.
  • मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11:30 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7 पर्यंत असते.
  • सकाळी 6:30 वाजता सकाळचे जागरण किंवा श्रृंगार आरती, दुपारी 12:30 वाजता भोग आरती आणि संध्याकाळी 07:30 वाजता या वेळांमध्ये मंदिर दिवसातून तीन वेळा आरती आयोजित करते.
  • आरती पाससाठी तुमच्याकडे चार कागदपत्रे असणे आवश्यक आहे-आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना आणि पारपत्र. कोणत्याही पडताळणी/सुरक्षा प्रक्रियेसाठी यापैकी एक असणे गरजेचे आहे. 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.