जोसेफ रुडयार्ड किप्लिंग (Rudyard Kipling) हे ब्रिटिश लेखक आणि कवी होते. ३० डिसेंबर १८६५ रोजी बॉम्बे, ब्रिटीश भारत येथे त्यांचा जन्म झाला. किप्लिंग (Rudyard Kipling) हे सुप्रसिद्ध लेखक होते. विशेषकरुन १८९४ मध्ये लिहिलेल्या द जंगल बुक या पुस्तकामुळे ते नावारुपाला आले. आजही त्यांच्या ह्या कथा लहान मुलांना आवडतात. जंगल बुक हे अजरामर साहित्य आहे.
मोगली, शेर खान, बालू अशी पात्रे रचून त्यांनी भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या रसिकांच्या मनावर राज्य केले. जंगल बुकची कथा मध्यप्रदेशच्या जंगलावर आधारित आहे. त्याचबरोबर त्यांनी गंगा दिन, द मॅन हु वुड बी किंग, द व्हाइट मॅन्स बर्डन, इफ अशी अनेक पुस्तके लिहिली. विशेष बाल साहित्य निर्माण करताना त्यात त्यांनी प्राण ओतले आहे. प्राण्यांच्या वर्तनाबाबत त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास करुन पात्रांची निर्मिती केल्याचे दिसून येते.
(हेही वाचा-PM Narendra Modi : अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)
१९०७ मध्ये, त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले इंग्रजी भाषेतील लेखक ठरले. विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव तरुण लेखक आहेत. त्यांची जन्मभूमी मुंबई म्हणजेच त्या काळचे बॉम्बेसाठी त्यांनी काढलेले उद्गार अतिशय महत्वाचे आहेत.
किप्लिंग म्हणतात,
“Mother of Cities to me,
For I was born in her gate,
Between the palms and the sea,
Where the world-end steamers wait.”
हेही पहा-
Join Our WhatsApp Community