Kanhaiyalal Maniklal Munshi : भारतीय विद्याभवनाचे संस्थापक कन्हैयालाल माणिकलाल मुंशी

277
Kanhaiyalal Maniklal Munshi : भारतीय विद्याभवनाचे संस्थापक कन्हैयालाल माणिकलाल मुंशी
Kanhaiyalal Maniklal Munshi : भारतीय विद्याभवनाचे संस्थापक कन्हैयालाल माणिकलाल मुंशी

कन्हैयालाल माणिकलाल मुंशी (Kanhaiyalal Maniklal Munshi) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, प्रसिद्ध गुजराती आणि हिंदी साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी भारतीय विद्या भवनाची स्थापना केली होती. कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याआधी त्यांना सशस्त्र क्रांतिकारकांचे आकर्षण होते. मात्र पुढे त्यांनी सत्याग्रह इत्यादी मार्गांचा स्वीकार केला.

कन्हैयालाल मुन्शी (Kanhaiyalal Maniklal Munshi) यांचा जन्म ३० डिसेंबर १८८७ रोजी बॉम्बे राज्यात म्हणजे सध्याचे गुजरात येथे झाला. त्यांचे कुटुंब हे उच्च शिक्षित भार्गव ब्राह्मण. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत कायद्याची प्रॅक्टिस केली. पत्रकार म्हणूनही ते यशस्वी झाले. १९१५ मध्ये गांधीजींसोबत यंग इंडियाचे सहसंपादक पद देखील त्यांनी भूषवले. त्याचबरोबर ते इतर अनेक मासिकांचे संपादक देखील होते.

(हेही वाचा-Rudyard Kipling : जंगल बुक मधल्या मोगलीला जन्म देणारे नोबल पारितोषिक विजेते रुडयार्ड किप्लिंग)

गुजराती साहित्य परिषदेत त्यांना मोठे स्थान मिळाले आणि त्यांच्या काही मित्रांसोबत १९३८ च्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय विद्या भवनची स्थापना केली. त्यां हिंदीत ऐतिहासिकआणि पौराणिक कादंबर्‍या लिहिल्या आहेत आणि कथांचे देखील लेखन त्यांनी केले आहे. १९५२ ते १९५७ पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते.

वकील, मंत्री, कुलगुरू, राज्यपाल अशा प्रमुख पदांवर काम करताना त्यांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली. यामध्ये कादंबरी, कथा, नाटक, इतिहास, ललित कला इत्यादी विषयांचा समावेश आहे. १९५६ मध्ये त्यांनी अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्यासोबत त्यांनी ’हंस’ या मासिकाचे सहसंपादन केले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.