Mangaon Accident : ताम्हिणी घाटात खाजगी बसचा भीषण अपघात; ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू

पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या बसला ताम्हीणी घाटात अपघात. ५५ विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

290
Mangaon Accident : ताम्हिणी घाटात खाजगी बसचा भीषण अपघात; ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू

पुणे येथील विद्यार्थ्यांची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी ( ३० डिसेंबर) सकाळी साडेसात च्या सुमारास हा अपघात झाला. (Mangaon Accident)

(हेही वाचा : Lakhbir Singh Landa : भारत सरकारकडून लखबीर सिंह लांडा दहशतवादी म्हणून घोषित)
माणगाव पोलिस ठाणे हद्दीत एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरून माणगावकडे येत असताना रस्त्याखाली घसरली आणि बस पलटी झाली. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Mangaon Accident )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.