एड्रिल टॉंट वुड्स, ज्याला टायगर वुड्स (Tiger Woods) म्हटले जाते. वुड्स हा अमेरिकन व्यावसायिक गोल्फर आहे. त्याच्या नावावर असंख्य गोल्फ रेकॉर्ड्स आहेत. वुड्सला सर्वकाली महान गोल्फर म्हणून ओळखले जाते. त्याचा समावेश वर्ल्ड गोल्फ हॉल ऑफ फेममध्ये झाला आहे.
टायगर वुड्सचा (Tiger Woods) जन्म ३० डिसेंबर १९७५ रोजी कॅलिफोर्निया येथे झाला. त्याचे वडील बेसबॉल खेळाडू होते. टायगर हे टोपणनाव त्याच्या वडिलांनीच दिले आहे. व्हिएतमानमधील त्यांचा एक सैनिक मित्र होता, त्याच्या नावावरुनच हे नाव ठेवण्यात आले. टायगर अगदी लहानपणापासून गोल्फ खेळतोय. त्याच्या वडिलांनी त्याला गोल्फचे प्रशिक्षण दिले.
(हेही वाचा-Lakhbir Singh Landa : भारत सरकारकडून लखबीर सिंह लांडा दहशतवादी म्हणून घोषित)
वयाच्या आठव्या वर्षी त्याने ज्युनिअर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. पुढे त्याने सहा वेळा ही चॅम्पियनशिप स्वतःकडे ठेवली. १२ व्या वर्षी त्याने यूएस ज्युनियर चॅम्पियनशिप पटकावली. पुढे वयाच्या १६ वर्षी यूएस चॅम्पियनशिप जिंकणारा तो सर्वात तरुण खेलाडू होता.. अनेक स्पर्धांमध्ये विजय प्राप्त करुन तो जगातला सर्वोच्च गोल्फ खेळाडू झाला. २००१ मध्ये मास्टर्स स्पर्धा सुद्धा त्याने स्वतःच्या खिशात घातली. पुढे सलग सहा वर्षे तो चॅम्पियन होता.
गोल्फच्या करिअर व्यतिरिक्त त्याने काही कंपन्यांसोबत करार करुन प्रचंड पैसा कमावला. असं म्हटलं जातं की टायगरचा जन्म केवळ गोल्फ खेळण्यासाठी झाला होता. कारण त्याच्यासारखा कुशल खेळाडू अजून तरी जन्माला आलेला नाही.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community