Ayodhya Ram Mandir : अयोध्येला ‘या’ तीन शहरांमधून आता थेट विमानसेवा; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

१७ जानेवारी २०२४ पासून बेंगळुरु ,कोलकाता आणि दिल्ली ते अयोध्या दरम्यान थेट उड्डाणे करण्यात येणार असल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे.

323
Ayodhya Ram Mandir : अयोध्येला 'या' तीन शहरांमधून आता थेट विमानसेवा; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. तर यापूर्वीच एअर इंडिया एक्सप्रेसने देशातील तीन शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. (Ayodhya Ram Mandir)

१७ जानेवारी २०२४ पासून बेंगळुरु आणि कोलकाता ते अयोध्या दरम्यान थेट उड्डाणे करण्यात येणार असल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे. याशिवाय ३० जानेवारीपासून एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली अयोध्या दरम्यान थेट विमानसेवा चालवणार आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा : PM Narendra Modi : अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)

जाणून घ्या काय आहे वेळापत्रक

बेंगळुरु आणि अयोध्या दरम्यानच्या फ्लाइट टाइम टेबल बद्दल माहिती देताना एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, पहिले फ्लाइट १७ जानेवारी रोजी सकाळी ८.०५ वाजता निघेल, जे सकाळी १०.३५ वाजता अयोध्येला पोहोचेल. अयोध्येहून पहिले विमान १७ जानेवारी रोजी सकाळी ११.०५ वाजता उड्डाण करेल. आणि दुपारी १२.५० वाजता कोलकत्याला पोहोचेल. तर एअर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट कोलकाता येथून दुपारी १.२५ मिनिटांनी उड्डाण करेल. आणि अयोध्येला ३.१० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर याबद्दल आधिक माहिती देताना एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, अयोध्येला उड्डाणांची मागणी लक्षात घेता दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.