Panvel : नेपाळमध्ये अडकलेल्या ‘त्या ५८ प्रवाशांसाठी’ देवेंद्र फडणवीस ठरले देवदूत

नेपाळ मध्ये अडकलेल्या पनवेलमधील ५८ प्रवाशांच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्व प्रवासी घरी पोहोचले.

217
Panvel : नेपाळमध्ये अडकलेल्या 'त्या ५८ प्रवाशांसाठी' देवेंद्र फडणवीस ठरले देवदूत

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कामोठे परिसरातील ५८ लोक एका ट्रॅव्हल्स एजन्सी च्या मार्फत नेपाळ येथे ट्रिपला गेले होते. मात्र या प्रवाशांची या ठिकाणी फसवणूकीची घटना घडली. या सगळ्या प्रवाशांच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे अगदी देवासारखे धावून आले. कारण त्यांनी केलेल्या एका कॉल नंतर सगळी यंत्रणा हलली आणि काठमांडू येथे अडकलेले सर्व प्रवासी रायगड जिल्ह्यात सुखरूप आपल्या घरी पोहोचले. (Panvel )

कामोठे येथे राहणारे हे ५८ प्रवासी नेपाळ येथे फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये ३५ महिला व २३ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व प्रवासी गोरखपूर मधून नेपाळमध्ये अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेतले. यासर्व भाविकांनी रायगड येथून निघण्यापूर्वी ट्रॅव्हल्स एजन्सीकडे पैसे जमा केले होते. मात्र त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रवाशांना तिकडे सांगण्यात आले की तुमचे पैसे आम्हाला मिळालेलेच नाही. संबंधित पर्यटन कंपनीने सगळ्या प्रवाशांना नेपाळमध्ये अडकवून ठेवले. काठमांडू येथे पोहोचल्यानंतर त्यांना एका ट्रॅव्हल्स बस मध्ये डांबून ठेवण्यात आले. त्यांना सांगिलते की, आधी सहा लाख रुपये जमा करा नाही तर सोडणार नाही. अशी धमकी ट्रॅव्हल्सचे मालक अंकित जैयस्वाल व त्याच्या साथीदारांनी सांगण्यास सुरुवात केली. एकंदरीतच प्रवासी प्रचंड घाबरून गेले.

एका मेसेजने हालली सूत्र
त्या प्रवाशांमध्ये काही पर्यटकांनी ओळखीच्या लोकांना व राजकीय लोकांना फोन करण्यास सुरुवात केली मात्र कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेवटी प्रवाशी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मेसेज करून सर्व परिस्थिती सांगितली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच प्रतिसाद दिला आणि फडणवीस यांनी तात्काळ सूत्र हलवली. त्यांच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेपाळचे असलेले माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना कळवले. त्यांनतर तातडीने राणा यांनी भाविकांची भेट घेतली. व सगळ्या भाविकांची व्यवस्था केली त्यांनतर एका विशेष बसने या सगळ्या भाविकांना गोरखपूर येथे पोहचविण्यात आले. फडणवीस यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क सोडून भोजनाची व्यवस्था केली. (Panvel )

(हेही वाचा : Ind vs SA 1st Test : पहिल्या कसोटीत षटकांची गती न राखल्यामुळे भारताला २ चॅम्पियनशिप गुणांचा फटका )

आणि घर गाठता आले
त्यांनतर मुंबई पर्यंत आणायचे कसे असा मोठा प्रश्न होता. त्यानंतर फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना संपर्क सोडून पत्र लिहून गोरखपूर वरून मुंबई पर्यंत रेल्वेला विशेष बोगी जोडण्याची विनंती केली त्यानंतर रेल्वेने गोरखपूर वरून मुंबई पर्यंत विशेष बोगी जोडून दिली. त्यांनतर सर्व सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले. त्यांच्यावर ओढवलेल्या या बाका प्रसंगात हे सर्व देवदूतासारखे धावून आले. या सर्व प्रवाशानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.