- ऋजुता लुकतुके
दुखापतग्रस्त मोहम्मद शामीच्या (Mohammad Shami) जागी दुसऱ्या कसोटीसाठी आवेश खानचा (Avesh Khan) भारतीय संघात (Indian Team) समावेश करण्यात आला आहे. (Ind vs SA 2nd Test)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणखी शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात (Indian Team) आवेश खानचा (Avesh Khan) समावेश करण्यात आला आहे. ३ जानेवारीपासून केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये ही कसोटी रंगणार आहे. भारतीय संघ (Indian Team) मालिकेत ०-१ असा पिछाडीवर आहे. (Ind vs SA 2nd Test)
‘मोहम्मद शामी (Mohammad Shami) दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्यामुळे त्याच्या जागी आवेश खानचा (Avesh Khan) समावेश करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. आवेश भारतीय अ संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेतच आहे. तो आता भारतीय वरिष्ठ संघात सामील होईल,’ असं बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी उशिरा जाहीर केलं. (Ind vs SA 2nd Test)
🚨 NEWS 🚨
Avesh Khan added to India’s squad for 2nd Test.
Details 🔽 #TeamIndia | #SAvINDhttps://t.co/EsNGJAo8Vl
— BCCI (@BCCI) December 29, 2023
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : पंतप्रधानपदावरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था; खर्गे नव्हे, राहुल गांधीच नेत्यांची पसंती)
२७ वर्षीय आवेश खान (Avesh Khan) नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता आणि त्याने २ सामन्यांत ६ बळी मिळवले होते. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत आवेशने ३८ सामन्यांमध्ये १४९ बळी मिळवले आहेत ते २२ च्या सरासरीने. सध्या आवेश भारतीय ए संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेतच खेळतोय. आणि तिथे नुकत्याच आटोपलेल्या कसोटीत आवेशनं २२ षटकांत ५४ धावा देत ५ बळी मिळवले होते. (Ind vs SA 2nd Test)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय तेज गोलंदाजांचं अपयश उठून दिसलं. आणि कर्णधार रोहित शर्मानेही बुमराला दुसऱ्या बाजूने चांगली साथ न मिळाल्याचं अधोरेखित केलं होतं. भारताने या कसोटीत मोहम्मद सिराज, बुमरा, प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर यांना संधी दिली. पण, कुणीही आपला प्रभाव पाडू शकलं नाही. (Ind vs SA 2nd Test)
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवी जाडेजाही पूर्णपणे तंदुरुस्त होऊन निवडीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Ind vs SA 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community