राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह

172

अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.

५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.

मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.महंत नृत्यगोपाल दास करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक प्रशासन तसंच मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना योग्य ते उपचार देण्याची विनंती केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.