Tesla Factory in Gujarat : टेस्लाचा पहिला कार कारखाना गुजरातमध्ये

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचा पहिला उत्पादन प्रकल्प गुजरातमध्येच उभा राहण्याची दाट शक्यता आहे. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा होऊ शकते. 

259
Tesla in India : टेस्ला कंपनी भारतात जागा पक्की करण्यासाठी एप्रिलमध्ये पाठवणार पाहणी चमू
  • ऋजुता लुकतुके

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचा पहिला उत्पादन प्रकल्प गुजरातमध्येच उभा राहण्याची दाट शक्यता आहे. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा होऊ शकते. (Tesla Factory in Gujarat)

एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी पुढील वर्षी भारतात आपला पहिला कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे. आणि कारखाना गुजरातमध्येच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. टेस्ला कंपनीची गुजरात सरकार बरोबरीच बोलणी अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Tesla Factory in Gujarat)

(हेही वाचा – देवगड किल्ला, रत्नागिरी येथील श्री गणेश मंदिर)

या तीन ठिकाणी जागांची पाहणी सुरू

जानेवारी २०२४ मध्ये ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात टेस्ला विषयीची महत्त्वाची घोषणा करण्यात येईल, असं अहमदाबाद मिरर वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटलं आहे. हा कारखाना नेमका कुठे असेल हे बातमीत स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी साणंद, बेचाराजी किंवा ढोलेरा या तीन ठिकाणी जागांची पाहणी सुरू असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. (Tesla Factory in Gujarat)

टेस्ला ही इलेक्ट्रिक कार श्रेणीतील जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीतही त्यांनी मोदींशी चर्चा केली होती. (Tesla Factory in Gujarat)

(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटी आधी भारतीय चाहत्यांना रोहित शर्माने काय वचन दिलं?)

टेस्ला कंपनीबरोबर करार करण्यास गुजरात सरकार उत्सुक

त्यानंतर काही महिन्यांपूर्वी गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टेस्लाशी संभाव्य कराराबद्दल सुतोवाच केलं होतं. टेस्ला कंपनीबरोबर अशा प्रकारचा करार करण्यासाठी गुजरात सरकार उत्सुक असल्याचं ते जाहीरपणे म्हणाले होते. (Tesla Factory in Gujarat)

टेस्ला कंपनीने गुजरातला पसंती दिल्याची मुख्य कारणं गुजरात सरकारचं उद्योजकतेला प्रोत्साहन देणारं धोरण, याबरोबरच बंदरांची सुसज्जता हे ही आहे. कारण, भारतात बनलेल्या टेस्ला गाड्या या जगात निर्यात होणार आहेत. (Tesla Factory in Gujarat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.