- ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षीच्या तुलनेत स्पर्धेची बक्षिसाची रक्कम १३ टक्क्यांनी वाढली आहे.
व्यावसायिक टेनिस हंगामातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत यंदा १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बक्षिसाची एकूण रक्कम ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. तर महिला आणि पुरुष विजेत्यांना आता ३.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे.
तर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव झालेल्या खेळाडूंनाही आता १,२०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. तर दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळलेल्या खेळाडूला १,८०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी जास्त आहे.
Record prize money on offer for AO 2024 👀💴https://t.co/ygmB8uiCtT
— #AusOpen (@AustralianOpen) December 28, 2023
(हेही वाचा – New Year Celebration : मुंबईत ३१ जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत कोणत्या गोष्टींवर आहे प्रतिबंध)
यावर्षी १४ जानेवारीपासून मेलबर्न पार्कवर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा रंगणार आहे. स्पॅनिश दिग्गज खेळाडू राफेल नदालही स्पर्धेदरम्यान व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करणार असून या स्पर्धेतून आपलं नशीब आणि तंदुरुस्ती आजमावणार आहे.
‘२०२४ च्या स्पर्धेचं बजेट गेल्यावर्षीच्या तुलनेत १० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरनी वाढलं आहे. स्पर्धेचा दर्जा राखता यावा आणि खेळाडूंनाही व्यावसायिक कारकीर्दीत मदत होईल असा मोबदला मिळवून देणं हे आमचं ध्येय आहे. त्यातून ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टींची सुरुवात या स्पर्धेपासून व्हावी असंही आम्हाला वाटतं,’ असं स्पर्धेचे संचालक क्रेग टिली मीडियाशी बोलताना म्हणाले.
त्यामुळेच यंदा पात्रता स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या खेळाडूलाही ३१,५०० ऑस्ट्रेलियन डॉलरचं इनाम मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community