केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (Central Industrial Security Force) प्रमुखपदी प्रथमच महिला अधिकारी निना सिंह यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या ५४ वर्षांत पहिल्यांदाच करण्यात आलेली ही महिला अधिकाऱ्याची निवड आहे. सीआयएसएफ प्रमुख शीलवर्धन सिंग यांच्या निवृत्तीनंतर नीना सिंह यांना सीआयएसएफ महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
मोदी सरकारने गुरुवारी अनेक इंटेलिजेंस ब्यूरो (IB) अधिकाऱ्यांची ३ निमलष्करी दलांचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला. १९६९ साली स्थापन झालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF)नेतृत्वाची धुरा फक्त पुरुष अधिकाऱ्यांवर होती. पुरुषी वर्चस्वाला मोडून काढत पहिल्यांदाच महिला अधिकारी निना सिंह यांची केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CISF) प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. २०२१मध्ये नीना सिंह या CISFमध्ये रुजू झाल्या. नीना सिंह ३१ जुलै २०२४ रोजी निवृत्त होणार आहेत. तोपर्यंत त्यांच्यावर CISFच्या प्रमुखपदी जबाबदारी असणार आहे.
(हेही वाचा – Australian Open Prize Money : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेची बक्षिसाची रक्कम विक्रमी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर)
आयपीएस नीना सिंह यांचा परिचय…
– केंद्रीय सुरक्षा दल (CISF)च्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या नीना सिंह या राजस्थान केडरच्या १९८९ बॅचच्या आयपीएस (IPS)अधिकारी आहेत. त्यांच्यावर CISFच्या अतिरिक्त महासंचालक (ADG)पदाची जबाबदारी होती. नीना सिंह या बिहारमधील पटना येथील रहिवासी असून, त्यांनी महिला विद्यालय, पटना येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ(JNU) आणि अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
- नीना सिंह या राजस्थान पोलिसांत महासंचालकपद मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. आयपीएस नीना सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. २००० साली राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. तेव्हा त्यांनी महिलांसाठी एक मोहीम चालवली होती. या मोहिमेत आयोगाच्या सदस्यांना विविध जिल्ह्यांचा दौरा करून महिलांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे काम सोपवण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community