एनडीएचे (NDA) सदस्य असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या (RPI) रामदास आठवले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याची तयारी केली असून लोकसभेच्या दोन जागांची मागणी त्यांनी केली आहे. (Ramdas Athawale)
लोकसभेसाठी दोन जागांची मागणी
आठवले यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप अधिकृत बोलणी झालेली नाही. मात्र आमच्या पक्षाला किमान दोन जागा मिळाव्यात त्यातील एक शिर्डी आणि दुसरी विदर्भ किंवा अन्य ठिकाणी. या दोन जागा निवडून आल्या तर रिपाई ला राज्यात मान्यता मिळेल,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. (Ramdas Athawale)
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसनंतर आता उबाठाचे ‘वंचित’शी अंतर )
विधानसभेच्या १० जागा मिळाव्या
पुढे जाऊन आठवले यांनी राज्यातील विधानसभेच्या (Assembly) १० जागांची मागणी करून टाकली. आठवले सध्या केंद्रात एनडीएचे सदस्य असून त्यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. (Ramdas Athawale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community