Ashish Shelar : उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय?; ॲड. आशिष शेलार यांचा सवाल

आशिष शेलार म्हणाले, राम मंदिर कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आणि ती असू शकतं नाही. ती समस्त हिंदू समाजाची आहे. साधुसंत महंत तसेच ज्या सामान्य माणसांनी राम मंदिरासाठी एक एक रुपया स्वतःच्या खिशातून दिला त्या सर्वांचे राम मंदिर आहे. खऱ्या ग्राम भक्तांची आहे. ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरे यांच्या गटाची नाही.

282
उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?; Ashish Shelar यांचा खोचक सवाल

राम वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षाने केली. राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख त्यांच्या वर्तमानपत्राने लिहिले. राम मंदिर बांधायला सुरुवात होताना जागेसंबंधी ज्यांनी वादविवाद केले अशा व्यक्तीची तळी उचलणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचा गट होता. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राम मंदिराशी संबंधच काय? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Ashish Shelar)

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, राम मंदिर कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आणि ती असू शकतं नाही. ती समस्त हिंदू समाजाची आहे. साधुसंत महंत तसेच ज्या सामान्य माणसांनी राम मंदिरासाठी एक एक रुपया स्वतःच्या खिशातून दिला त्या सर्वांचे राम मंदिर आहे. खऱ्या ग्राम भक्तांची आहे. ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाची नाही. भगवान राम हा काल्पनिक आहे असे म्हणणारे कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वकील आहेत. रामसेतू असं काही प्रकार नाही अशी काँग्रेसची (Congress) भूमिका आहे. त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हातमिळवणी आहे. राम मंदिर ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही आम्ही तसे समजत नाही. ती हिंदू समाजाची, राम भक्तांची, साधुसंतांची, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची आहे. उद्धव ठाकरे यांचा राम मंदिरांशी तिळमात्र संबंध नाही कारण त्यांची मैत्री राम मंदिराला विरोध केला त्यांच्याशी आहे. (Ashish Shelar)

हा श्रद्धेचा उत्सव आहे…..

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, राम मंदिराचा राजकीय इव्हेंट होऊच नये आणि कुणी तसे करतही नाही. हा श्रद्धेचा उत्सव आहे. इतके वर्षे भारतीय मनामध्ये जे साठले आहे त्याचा उत्सव आहे. या आनंद उत्सवामध्ये सर्वांना सहभागी झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. ज्यांचा या उत्सवामध्ये तिळमात्र संबंध नाही त्यात निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा समावेश आहे. (Ashish Shelar)

त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे बोलणे हा थयथयाट आहे. राजकीय भूमिकेतून त्याला विरोध करण्यासाठी उद्धवजी तुम्ही का पुढे आहात? असाही सवाल त्यांनी केला. त्यातून कुठली मते तुम्हाला मिळवायची आहेत? त्याची चादर कुठल्या रंगाची आहे? हे तुम्ही स्पष्ट करा असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले. (Ashish Shelar)

खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे ‘नटसम्राट’

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणे ही महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करू शकतात. कुणाच्या वजनावर, व्यक्तिमत्त्वावर, वक्तृत्वावर टीकाटिपणी आलोचना करणे आणि घालून पाडून बोलणे हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ठेका आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नटसम्राट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. तुम्हाला याच्यामुळे मते मिळणार नाहीत. देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या लढाईमध्ये बाल स्वयंसेवक असल्यापासून आहेत. उद्धवजी तुम्ही कधी कारसेवेत दिसलात का नाहीत. कधी तुम्ही शीलापूजन केले का नाही तर नाहीत. कधी तुम्ही गंगापूजन केले का नाही. एक रूपया राम वर्गणीला दिलात का तर नाहीत. तुमचा केवळ राजकीय संबंध अयोध्येशी होता. देव देश आणि धर्मासाठी तुम्ही राजकीय घोषणा दिल्यात. (Ashish Shelar)

केवळ राजकीय हेतूने मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसल्यावर तुम्ही देव, देश आणि धर्म विसरलात. ज्यांनी राम ही कल्पना सांगितलं त्या काँग्रेससोबत गेलात. तुम्ही रंग इतका बदलला की, ज्या समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह यादवांनी राम भक्त कोठारी बंधूंवर शरयू नदीकिनारी गोळ्या झाडल्या त्यांच्याशी तुम्ही संधान साधले. समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंह यादव यांचे हात राम भक्तांच्या खुनाच्या रक्ताने रंगले आहेत त्याच्याशी तुम्ही हातमिळवणी केली. तुम्ही कारसेवक आणि राम भक्तावर बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला. जो स्वतःला हिंदू समजतो त्याने राम मंदिरात जातील उद्धव ठाकरे दर्शन घेणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Flights to Ayodhya : इंडिगो, एअर इंडियाने जाहीर केली अयोध्येसाठी विमान उड्डाणं)

संजय राऊत यांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही

महायुतीच्या जागा वाटपासंबंधी निर्णय तिन्ही पक्षाची नेते घेतील. ज्या पद्धतीचा कलगीतुरा ठेवणीतले शब्द दाखवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की, संजय राऊत यांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही परंतु तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमच्याकडे चर्चा, विमर्श चालू आहे. तिन्ही नेते आपली भूमिका स्पष्ट करतील. लोकसभा निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलो आहोत. भारतीय जनता पक्षाची (BJP) महाराष्ट्र प्रदेशची अतिशय महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा संयोजक सहभागी झाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याच्या दृष्टीने विचारविनिमय झाला. भाजपा केंद्रस्तरावरून आलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष तयारी आणि आयोजनबाबत चर्चा झाली. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप केला, अशी माहिती दिली. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.