ईशान्येतील उग्रवादी संघटना ULFA ने सरकारसोबत केला समंजस्य करार

207

राजधानी दिल्लीत, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) च्या प्रो-टॉक गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र आणि आसाम सरकारसोबत त्रिपक्षीय समंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे आभार मानत, ‘आसामची शांतता प्रक्रिया पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे’, असे म्हटले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, आसाम आणि संपूर्ण ईशान्येला बराच काळ हिंसाचार सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य भारत अतिरेकी, हिंसाचार आणि संघर्षापासून मुक्त करण्यासाठी गृह मंत्रालय कार्यरत आहे. याचबरोबर भारत सरकार, आसाम सरकार आणि ULFA यांच्यात करार झाला आहे. आसाममधील सर्व सशस्त्र गटांना येथेच संपवण्यात आम्हाला यश आले आहे., असेही शाह म्हणाले.

(हेही वाचा Mumbai Riots : जरांगे-पाटलांचा मुंबईत ३ कोटी जमाव जमवण्याचा इशारा; यापूर्वी कोणकोणत्या आंदोलनांमुळे हादरलेली मुंबई?)

काय आहे ULFA संघटना?

ULFA ही आसाममधील सक्रिय दहशतवादी संघटना आहे. ७ एप्रिल १९७९ रोजी परेश बरुआ आणि त्यांचे भागीदार अरबिंदा राजखोवा, गुलाब बरुआ उर्फ ​​अनुप चेतिया, समीरन गोगोई उर्फ ​​प्रदीप गोगोई आणि भद्रेश्वर गोहेन यांनी या संघटनेची स्थापना केली होती. आसामला स्वायत्त आणि सार्वभौम राज्य बनवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यासाठी अनेक मोठे हल्लेही झाले. ३१ डिसेंबर १९११ रोजी उल्फा कमांडर-इन-चीफ हिरक ज्योती महल यांच्या मृत्यूनंतर सुमारे ९ हजार उल्फा सदस्यांनी आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर जवळपास १७ वर्षांनी २००८ मध्ये उल्फा नेता अरबिंदा राजखोवा यांना बांगलादेशातून अटक करण्यात आली होती. नंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार 1990 पासून काम करत आहे. अनेकवेळा लष्करी कारवाई करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.